प्रेमाची आठवण❤️....या गीताचे इस्लामपूरमध्ये चित्रीकरण सुरू
के. चंद्रा प्रॉडक्शन इस्लामपूरची निर्मिती असलेले प्रेमाची आठवण या भावना प्रधान गीताचे चित्रिकरण इस्लामपुरात सुरू झाले आहे .याचा मुहूर्त माजी प्राचार्य श्री. विश्वास सायनाकर व सौ. मनिषा रवी बावडेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.प्रमुख भूमिकेत प्रिया चव्हाण व चंद्रकांत कांबळे आहेत.बरखा करवा असिस्टंट डायरेक्ट, किरण जेजुरकर डी ओ पी तर असिस्टंट कॅमेरामन म्हणून किरण पोवार आहेत. राज पवार मेकपमन, आर्ट डारेक्टर मनोज वेटम, सुमित भंडारे , ऋषिकेश शिंदे हे काम पाहत आहेत. मुहूर्त प्रसंगी सुमित अय्यर हेमंत रकटे, अमोल वाघ ,सिने अभिनेते सत्याप्पा मोरे उपस्थित होते. दिग्दर्शक /गीतकार चंद्रकांत कांबळे असून गायिका संज्योती जगदाळे आहेत. संगीत ओमकार सुतार यांनी दिले आहे.लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला गोड प्रेमाची आठवण हे गीत के. चंद्रा या YouTube चॅनल वर पहायला मिळणार आहे.

Comments
Post a Comment