काकासाहेब चव्हाण कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रा.डॉ.उषादेवी साळुंखे
तळमावले दि. o१ जुलै, २०२४- (प्रतिनिधी)
काकासाहेब चव्हाण कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य पदी प्रा. डॉ. उषादेवी साळुंखे यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरने नियुक्ती केली आहे.
प्रा. डॉ. उषादेवी साळुंखे यांनी यापूर्वी जत, तळमावले येथील महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विविध समित्यांमध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांमध्ये विविध विषयांवर साधनव्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले आहे. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे त्या कार्यरत आहेत.
त्यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेचे आदरणीय मा. कार्याध्यक्षसाहेब प्राचार्य अभयकुमार साळुंखे, मा. सचिवा प्राचार्या सौ.शुभांगीताई गावडे, मा. प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ (सहसचिव (प्रशासन ) विभाग श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) मा. कौस्तुभ गावडे (सीईओ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड (सदस्य व्यवस्थापक मंडळ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) मा. एस. के. कुंभार ( माजी सहसचिव (अर्थ) विभाग श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) मा. आर. के. भोसले सहसचिव (प्रशासन ) विभाग श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी - माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments
Post a Comment