विशाल सुहास कुंभार याचा वाढदिवस वहया वाटप करून साजरा
कुठरे/सुनील पवार यांचेकडून
कुठरे ता . पाटण येथील NESK माजी विद्यार्थी संघाचे सदस्य तसेच मुंबई येथील लघु उद्योजक श्री.सुहास आनंदराव कुंभार यांनी त्यांचा मुलगा विशाल याचा वाढदिवस अंगणवाडी शाळा क्रमांक १ / २ मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य शिशपेन्सील , वॉटर कलर , पेन्सील कलर कोरे A- 4 पेपर देऊन तर जि.प. प्राथमिक शाळा , कुठरे शाळेतील इ.१ ली ते ४ थी मधील सर्व मुलांना तसेच न्यू इंग्लिश स्कूल , कुठरे हायस्कूल मधील इ.५ वी ते १० वी मधील सर्व विद्यार्थ्यांना वहया वाटप करुन साजरा केला .
वाढदिवस म्हणजे आनंददायी दिवस . यादिवशी आनंद घ्यायचा असतो तसाच आनंद इतरांना सुद्धा दयायचा असतो . हा आनंद द्विगणीत करण्याकरिता कुंभार परिवारांनी शाळेतील मुलांना वहया वाटप करुन विशालचा वाढदिवस आनंदात साजरा केला . यापूर्वी सुहास कुंभार यांनी इ .५ वी मधील ३५ मुलांना स्कूल बॅग वाटप केल्या होत्या .
याप्रसंगी हायस्कुलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ . कविता पाटील मॅडम , जेष्ठ नागरिक श्री . कृष्णाजी पाटील ( आण्णा ) , निवृत्त शिक्षक श्री .आनंदराव कुंभार गुरूजी , कलाशिक्षक श्री . दामोदर दिक्षीत सर , माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुनिल पवार , आशुतोषराज कुंभार सर , रमेश हल्लोळी सर , राहुल पडधान सर , गणेश गलांडे सर , सविता काळे मॅडम , रोहिणी भिंगारदेवे मॅडम , सौ माधुरी पाटील मॅडम , सौ . सुनंदा आष्टेकर मॅडम , राजश्री कांबळे , सौ . मिरा पाटील मॅडम , मुख्याध्यापक श्री जगन्नाथ लोकरे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
या आनंददायी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुनिल पवार यांनी केले , स्वागत रमेश हल्लोळी सर यांनी केले तर आभार प्रभारी मुख्याध्यापिका कविता पाटील यांनी मानले .


Comments
Post a Comment