मानवी जीवनात योगाला अनन्य साधारण महत्व - श्री.पी.एल.केंडे
पाटण-
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयामध्ये आज 21 जुन आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल.केंडे सर यांनी मानवी जीवनात योगाला अनन्य साधारण महत्व आहे, असे मत योग दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात आपले शरीर, आपले आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी नियमीत व्यायाम, योगासने करणे गरजेचे आहे असे ते यावेळी म्हणाले.
या योग वर्गासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील उपशिक्षक श्री.एस.एल.डोंगरे, श्री.एस.व्ही.भिसे, श्री.एस.डी कुंभार यांनी योगाचे महत्व, फायदे तसेच योगाची गरज याविषयी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. या योग दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम यांनी केले, तर आभार कु.मणेर एस.एस.यांनी मानले. या योग वर्गासाठी विद्यालयातील सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments
Post a Comment