विक्रमसिंह देसाई यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
पुणे/स्पंदन एक्सप्रेस वृत्तसेवा
शिवसमर्थ प्रतिष्ठान, पुणे यांचेवतीने शिक्षण क्षेत्रातील भरीव व उल्लेखनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पहिलाच शैक्षणिक सेवागौरव राज्यस्तरीय पुरस्कार रयत बँकेचे संचालक व न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनि. कॉलेज, काळगाव शाखेचे लिपीक विक्रमसिंह तानाजीराव देसाई यांना दि. 01 जून 2024 रोजी पुणे या ठिकाणी आयोजित समारंभात श्रीमती अश्विनी कदम मा. चेअरमन पुणे महापालिका स्टँडिंग कमिटी, श्री. काकासो चव्हाण नगरसेवक, पुणे महापालिका, सचिन दोडके नगरसेवक, पुणे महापालिका, चौधरी साहेब शिक्षणाधिकारी पुणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव खांडेकर, शिक्षकेत्तर राज्य महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सातारा शिक्षकेत्तर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश इंगवले सचिव इम्रान मुल्ला, पाटण तालुका अध्यक्ष अमीर मुलाणी, मुख्याध्यापक अनिल कांबळे, भरत कुंभार, हणमंत भंडलकर, बापुराव जाधव, श्री . सुनिल कदम, श्री.प्रकाश शिर्के, श्री.अविनाश शिंदे व राज्यभरातून आलेले मोठ्या संख्येने शिक्षण क्षेत्रातील आजी माजी मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक,उपशिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच श्री.विक्रमसिंह देसाई यांचे नातेवाईक, मित्र मंडळी, पापर्डे गावातील सर्व संस्थाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांनी श्री.विक्रमसिंह देसाई यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment