डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा
तळमावले / वार्ताहर: पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबईहून कायमचे गावी परतलेले बाळू बाबू डाकवे यांनी उदरनिर्वाहासाठी मोठ्या उमेदीने शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. घरात पत्नी इंदूबाई आणि २३ वर्षांची मूकबधिर मुलगी असा परिवार असलेल्या बाळू डाकवे यांच्या कुटुंबाचा गाडा याच शेळ्यांवर अवलंबून होता. मात्र, बिबट्याच्या या हल्ल्यामुळे या गरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन एका रात्रीत हिरावून घेतले गेले असून, केवळ पंचनामे न करता प्रशासनाने त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याने शेडमध्ये प्रवेश करून अक्षरशः धुमाकूळ घातला. या भीषण हल्ल्यात डाकवे यांच्या तीन गाभण शेळ्या आणि एक बोकड फस्त करण्यात आला. दोन शेळ्या अद्याप बेपत्ता असून, सुदैवाने केवळ एकच शेळी...




Comments
Post a Comment