मस्करवाडी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन

तळमावले/वार्ताहर

           पाटण तालुक्यातील मस्करवाडी (काळगांव) येथे सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सदर पारायण सोहळयाचे हे 31 वे वर्ष असून ह.भ.प. सुरेश महाराज मस्कर हे व्यासपीठ चालक चालक आहेत.

         ग्रंथपुजन व मुर्तीपुजन ग्रामस्थ मंडळ मस्करवाडी यांच्या हस्ते, मृदंगमणी ह.भ.प.सुनील महाराज आळंदीकर, हार्मोनियम ह.भ.प.बबन जोशी व भरत मस्कर, विणेकरी मारुती ल.मस्कर, गायक ह.भ.प.जगन्नाथ लोहार, भगवान महाराज सावंतवाडी, राम महाराज चोरगे, चोपदार ह.भ.प. विकास धोंडीराम मस्कर यांची साथ लाभणार आहे.

        बुधवार दि.3 एप्रिल रोजी ह.भ.प.धनंजय महाराज दहीगावकर, गुरुवार दि.4 एप्रिल रोजी ह.भ.प.स्वप्नील महाराज अभयचीवाडी, शुक्रवार दि. 5 एप्रिल रोजी ह.भ.प.शामराव महाराज आळंदीकर, शनिवार दि.6 एप्रिल रोजी ह.भ.प.रुपालीताई कंदारे, रविवार दि. 7 एप्रिल रोजी ह.भ.प.अनिल महाराज पापर्डे, सोमवार दि. 8 एप्रिल रोजी ह.भ.प.पप्पू महाराज नाडे यांची कीर्तने होणार आहेत.

            तसेच शुक्रवार दि.5 एप्रिल, 2024 रोजी दुपारी 2 काळेश्वर सेवा मंडळ मस्करवाडी यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभ होईल. मंगळवार दि.9 एप्रिल, 2024  रोजी ह.भ.प. चंद्रकांत महाराज मस्कर यांचे काल्याचे कीर्तन होईल. नंतर दिंडी मिरवणूक, दहीहंडी व नंतर श्री भैरवनाथ यात्रा झाल्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. 

            याशिवाय दररोज सकाळी 4 ते 6 काकड आरती, सकाळी 7.30 ते 10 व दुपारी 2.30 ते 4.30 ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 7 ते 9 हरिकीर्तन होईल. 

            डाकेवाडी, जोशेवाडी, करपेवाडी, लोहारवाडी, निवी, चोरगेवाडी, मळाईचीवाडी व पंचक्रोशीतील भजनी मंडळे कीर्तनाला साथ करणार आहेत.

            तरी या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविक, ग्रामस्थ यांनी घ्यावा असे आवाहन श्री काळेश्वर सेवा मंडळ मस्करवाडी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ मस्करवाडी (काळगांव) यांनी केले आ

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न