शालेय स्पर्धा परीक्षामध्ये कु. आराध्या कदम राज्यात द्वितीय
पाटण - मोरणा शिक्षण संस्थेच्या वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूल दौलतनगर या विद्यालयातील इयत्ता 4 वी मध्ये शिकणारी कु.आराध्या प्रकाश कदम या विद्यार्थ्यांनीने भारती विद्यापीठ पुणे परीक्षा विभाग यांच्या वतीने शालेय स्पर्धा परीक्षामध्ये राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे तिला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र रोख 1000/- रू. देवून तिचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे, यासाठी तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.सुमित देसाई सर सर,सौ.जंगम,सौ.गव्हाणे मॅडम, सौ.रेश्मा पाटील मॅडम, सौ.जाधव मॅडम, सौ.चोपदार मॅडम, सौ.उदुगडे, सौ.पवार मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या दैदिप्यमान यशाबद्दल कु.आराध्या प्रकाश कदम या विद्यार्थिनीचे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री मा.नामदार शंभूराज देसाईसाहेब, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई दादा, युवा नेते जयराज देसाई, आदित्यराज देसाई तसेच सचिव श्री.डी.एम.शेजवळ, बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव श्री एन.एस.कुंभार व मुख्याध्यापिका सौ.योगिता संकपाळ तसेच सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व आजी माजी विद्यार्थी, पालक यांनी कु.आराध्या कदम या विद्यार्थीनीचे अभिनंदन केले.

Comments
Post a Comment