पत्रकार भिमराव बालकाबाई हिंदुराव धुळप यांची एस ई ओ पदी नियुक्ती

प्रतिनिधी - धारावीतील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेले व धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक श्री भिमराव बालकाबाई हिंदुराव धुळप यांची महाराष्ट्र शासनाच्या मुंबई शहर विभागासाठी विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती  शासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

  भिमराव धुळप हे नुसते पत्रकारिता न करता सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात  उल्लेखनीय असे कार्य करत आहेत.अनाथाश्रम,वृद्धाश्रम, आदिवासी पाडा येथील गरजूंना मदत,ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री वैधकिय सहाय्यता निधी मिळवून देणे, त्यांना रुग्णालय उपलब्ध करणे (आरोग्यदूत म्हणून काम), दिव्यांगांना मदत असे कार्य चालूच आहे, या गोष्टीची दखल घेऊन राज्यातील अनेक संस्थांनी त्यांना विविध पुरस्काराने गौरविले आहे. आतापर्यंत त्यांना २० पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ७५० हुन अधिक रुग्णांना मदत केली आहे. या सर्व बाबीची दखल घेऊन  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने खा.राहुल शेवाळे यांनी शिफारस करून पालकमंत्री  दीपक केससकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांना दिले व श्री भिमराव बालकाबाई हिंदुराव धुळप यांची एस ई ओ पदी नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग