रामिष्टेवाडी च्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - संजय आंबुळकर


 काळगाव/ संदिप सावंत

      रामिष्टेवाडी ते भरेवाडी पोच रस्त्याच्या सुधारणा डोंगरी विकास आराखडा 2023/ 24 कामांचा उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंजाबराव देसाई, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास गोडांबे, अनिल शिंदे, संजय आंबुळकर, बबन शिखरे, नामदेव रामिष्टे, मारुती शिखरे, अनिल काळे, मारुती सावंत, गोविंद गोटुगडे, उपसरपंच बबन शिखरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

        संजय आंबुळकर म्हणाले की, ग्रामपंचायत रामिष्टेवाडी सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांच्या गटांमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे.

          रामिष्टेवाडी  ते भरेवाडी हा पोच रस्त्याची सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रस्ताव दिला होता त्यासाठी तात्काळ निधी मंजुरी मिळाला असून त्याच्या कामाचा या ठिकाणी उद्घाटन समारंभ होत आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या रस्त्यावर वरुन वाहतूक करत असताना रस्ता खराब असल्यामुळे प्रचंड वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता तशीच अपघाताचेही प्रमाण वाढली होते. मंत्री शंभूराज देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे आणि या विकासाच्या सोबत आम्ही जाण्याचा योग्य निर्णय घेतलेला आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील उर्वरित सर्व कामे पूर्णत्वाकडे नेली जातील असाही आश्वासन ग्रामस्थांना दिले.

       पंजाबराव देसाई म्हणाले की, संजय आंबुलकर तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली असणारी ग्रामपंचायत ग्रामस्थ रामिष्टेवाडी ही नेहमीच आमच्या पाठीशी होती पण आता अधिकृतपणे त्यांनी आमच्या पक्षांमध्ये प्रवेश केला असल्यामुळे त्यांच्या विकासाला एक कोणताही निधी कमी पडणार नाही तसेच त्यांची उर्वरित सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल.


Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न