जिल्हाधिकाऱ्यानी केला शेतीमित्र पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान
तळमावले/वार्ताहर
सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शेतीमित्र पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि पत्रकार यांचा किसान उत्सव दिनाचे औचित्य साधत शाल, श्रीफळ, आंब्याचे रोपटे आणि कोल्हापूरी फेटा देवून सन्मान केला. जिल्हाधिकारी डुडी यांच्यासमवेत यावेळी सातारा जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री फरांदे व अन्य कृषी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कौतुक सोहळयाचे आयोजन केले होते.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कृषीविषयक पुरस्कारांची घोषणा झाली असून त्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह एका कृषी सहायक व पत्रकार यांचा समावेश आहे.
यामध्ये वसंतराव नाईक शेतिनिष्ठ पुरस्कार 2020 (कोल्हापूर विभाग सर्वसाधारण गट) नितीन बाजीराव वरखडे (रा.वरखडवाडी, ता.वाई), वसंतराव नाईक शेतिनिष्ठ पुरस्कार 2021 (कोल्हापूर विभाग सर्वसाधारण गट) अधिक मारुती माने (मानेगाव, ता.पाटण), वसंतराव नाईक शेतिनिष्ठ पुरस्कार 2022 (कोल्हापूर विभाग सर्वसाधारण गट) प्रशांत भिकू शिंगटे (रा.खडकी, ता.वाई), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार 2021 (कोल्हापूर विभाग विभागून) सचिन साधू सांगळे (रा.कुरवली बुद्रुक, ता.फलटण), उद्यानपंडित पुरस्कार 2021 (कोल्हापूर विभाग विभागून) रामदास भुजंगराव कदम (रा.गिरवी, ता.फलटण), युवा शेतकरी पुरस्कार 2021 (कोल्हापूर विभाग) सौरभ विनयकुमार कोकीळ, (उद्यानपंडित पुरस्कार 2022 (कोल्हापूर विभाग) जालिंदर जगन्नाथ दडस (टाकेवाडी, ता.माण), कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार 2021 (कोल्हापूर विभाग) अरुण चंद्रकांत कचरे (रा.वाघेरी, ता.कराड), कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार 2022 (कोल्हापूर विभाग) उद्धवराव ज्ञानेश्वर बाबर (रा.देवापूर, ता.माण), वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार 2022 (कोल्हापूर विभाग विभागून) संदीप राजाराम डाकवे (रा.डाकेवाडी, ता.पाटण), युवा शेतकरी पुरस्कार 2022 (कोल्हापूर विभाग विभागून) नीलेश हणमंत पवार (रा.असवली, ता.खंडाळा), जिजामाता कृषिभूषण पुरस्कार (कोल्हापूर विभाग) रूपाली सत्यवान जाधव (रा.कर्णवडी, ता.खंडाळा) यांना, तर पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार (कोल्हापूर विभाग) कृषी सहायक सचिन सोमा जाधव (रा.सासकल, ता.फलटण) यांना जाहीर झाला. या सर्वांचा शेतीमित्र या पुरस्काराबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला.
यशस्वी शेतकऱ्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक आत्मा सातारा विकास बंडगर, कृषि उपसंचालक जि.अ.कृ.अ. कार्यालय सातारा संतोषकुमार बरकडे, कृषि विकास अधिकारी जि.प.सातारा विजय माईनकर, कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, पाटण तालुका कृषी अधिकारी श्री कुंडलिक माळवे, तंत्र अधिकारी (विस्तार) जि.अ.कृ.अ. कार्यालय सातारा समीर पवार, मंडळ कृषी अधिकारी सुनील ताकटे, कृषि सहायक प्रमोद गाढवे कृषी सहायक ए.बी.पवार व जी.डी.सावंत व अन्य यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
लवकरच शेतीमित्र पुरस्काराचे वितरण शासनाच्या वतीने मुख्यमंत्री, राज्यपाल, कृषीमंत्री आणि अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक केले जाणार आहे.


Comments
Post a Comment