‘स्पंदन आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन एक्सप्रेस या वार्तापत्राच्यावतीने सरपंचांना त्यांनी केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामाकरिता स्पंदन आदर्श सरपंच सन्मान देवून गौरविण्याचे ठरविले आहे. यामध्ये सरपंचांनी त्यांच्या कालावधीत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येईल. त्याचबरोबर त्यांच्या ह्या कामामुळे त्यांच्या गावामध्ये काय बदल झाला याचीही नोंद घेतली जाणार आहे. या पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन स्पंदन एक्सप्रेस वार्तापत्राचे संपादक डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे.
तरी सरपंचांनी या पुरस्कारासाठी नामांकने सादर करावीत. जेणेकरून आपल्या आदर्श कामाला प्रसिद्धी मिळेल, त्याचबरोबर या कामामुळे इतर ग्रामपंचायत, सरपंच, सदस्य यांना प्रोत्साहन मिळेल व ते अधिक उत्साहाने कामास सुरुवात करतील. या पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत रविवार दि.31 मार्च, 2024 आहे
पुरस्कारासाठी सरपंचांनी आपल्या नामंकनासोबत आपण केलेल्या कार्याचे फोटो, वृत्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे इ.माहिती पाठवावी. आलेल्या प्रस्तावांमधून निवड समितीने निवडलेल्या सरपंचांना भव्यदिव्य व शानदार कार्यक्रमात शासकीय अधिकारी, सेलिब्रिटी व अन्य मान्यवर यांच्या हस्ते स्पंदन आदर्श सरपंच सन्मान देवून गौरवण्यात येईल. तरी सरपंचांनी आपली नामांकने ‘राजनंदा प्राईड अपार्टमेंट’, फ्लॅट नं.8, होली फॅमिली काॅन्व्हेंट स्कुलच्या पाठीमागे, सैदापूर विद्यानगर, ता.कराड, जि.सातारा. 415124 या पत्त्यावर सादर करावीत असे आवाहन स्पंदन एक्सप्रेस वार्तापत्राचे संपादक डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डाॅ.संदीप डाकवे मो.9764061633 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Comments
Post a Comment