स्त्रियांचे मानसिक आजार व त्यावरील उपचार यावर काकासाहेब चव्हाण कॉलेजमध्ये कार्यशाळा संपन्न


तळमावले/वार्ताहर

            बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण अग्रणी महाविघालय योजना आणि काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले यांच्या संयुक्त विद्यमाने 'अंतर्गत तक्रार निवारण कक्ष ' या समितीच्यावतीने 'स्त्रियांचे मानसिक आजार व आजाराची लक्षणे' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी डॉ.प्राची शिद्रूक साधनव्यक्ती म्हणून उपस्थित होत्या. 

            डॉ. प्राची शिद्रूक विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना  म्हणाल्या, आरोग्यम धनसंपदा हे ब्रीद आपण  सांभाळले पाहिजे. तसेच आपल्यावर समाजातून कुटुंबातून जे आघात होत असतात त्या आघातातून आपली मानसिकता तसेच शारीरिक क्षमता चांगली कशी ठेवता येईल याविषयी मार्गदर्शन केले. मुलींनी आहारामध्ये कोणत्या फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्ये दररोज घेणे आवश्यक आहे याचेही मार्गदर्शन त्यांनी केले. एखाद्या मुलीला जर काही शारीरिक अडचणींना सामना करावा लागत असेल तर तिने आपल्या पालकांशी पहिल्यांदा हितगुज करणे आवश्यक आहे. 

                आपली आई ही आपली मैत्रीण असते हे लक्षात घेऊन तिला सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थिनींनी देणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गाडे यांनीही मुलींना मानसिक व शारीरिक असणाऱ्या व्याधींपासून मुक्त व्हावयाचे असेल तर प्रथमतः हे सगळे आपल्याला मांडता आले पाहिजे. तरच त्यावर योग्य तो उपचार मिळू शकतो म्हणून मुलींनी आई -वडील आपले गुरुजन यांना आपल्यापुढील असणाऱ्या विविध शारीरिक व मानसिक समस्या मुक्त व खुल्यापणाने सांगितल्या तर आपणास योग्य ते मार्गदर्शन होऊ शकते. आजची स्त्री ही आधुनिक क्षेत्रामध्ये वावरणारी असल्यामुळे मुलींनी भविष्यकाळाचा वेध घेऊन आपले आरोग्य सांभाळणे आवश्यक आहे. 

                कार्यक्रमासाठी अंतर्गत तक्रार निवारण कक्षातील  सदस्य  प्रा.बी.एस. सालवाडगी, प्राध्यापिका बाऊचकर, प्रा. डॉ. मुल्ला व प्रा. प्रतीक्षा कदम उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक कु. प्रतीक्षा कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अंकिता पवार व कु.निवेदिता कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.जे.यु. मुल्ला यांनी मानले. या कार्यक्रमाचे सर्व आयोजन प्रा.डॉ.उषादेवी साळुंखे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न