वांगव्हॅली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डाॅ.संदीप डाकवे यांची निवड

तळमावले/वार्ताहर

     ढेबेवाडी (ता.पाटण) येथील वांगव्हॅली पत्रकार संघाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. यावेळी वांगव्हॅली पत्रकार संघ ढेबेवाडीच्या अध्यक्षपदी डाॅ.संदीप डाकवे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी तरुण भारतचे नितीन बेलागडे, सचिवपदी प्रभातचे विजय सुतार तर कार्याध्यक्षपदी पुण्यनगरीचे प्रमोद पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

डाॅ.संदीप डाकवे हे गेली 17 वर्षापासून पत्रकारितेमध्ये काम करत आहेत. उत्कृष्ट पत्रकारितेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांचा पुरस्कार देवून 5 वेळा सन्मान केला आहे. लेखनाबरोबरच त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. 

यावेळी दै.ऐक्यचे संजय लोहार, पुढारीचे पत्रकार तुषार देशमुख, जेष्ठ पत्रकार पोपटराव झेंडे, दै.कृष्णाकाठ चे संपादक चंद्रकांत चव्हाण, नितीन बेलागडे, विजय सुतार, हरीष पेंढारकर, अमोल चव्हाण, प्रमोद पाटील, पोपटराव माने, साप्ताहिक कुमजाई पर्वचे संपादक प्रदिप माने उपस्थित होते.

  गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत वांगव्हॅली पत्रकार संघाने विविध उपक्रम राबवून समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवून वांगव्हॅली पत्रकार संघाचा ठसा समाजमनावर उमटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी याप्रसंगी सांगितले. विजय सुतार यांनी स्वागत केले तर पोपटराव झेंडे यांनी आभार मानले

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न