ढेबेवाडी हायस्कूल मध्ये 62 वर्षांनी भेटले विद्यार्थी

 ढेबेवाडी/पोपटराव झेंडे 

                1973 सालच्या इयत्ता 5 वी च्या बॅचला 50 वर्षे पूर्ण झाल्याचे सुवर्ण महोत्सवी वर्षांचे औचित्य साधत सुमारे 62 वर्षांनी माजी विद्यार्थ्यी स्नेह मेळाव्याने ज्या शाळेत शिकून मोठे झाले त्याच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व जुनियर कॉलेज ढेबेवाडी शाळेत एकमेकाना भेटल्या ने सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला.

            या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी नानासाहेब गोरे यांनी भुषवले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ आशोकरावजी भोईटे हे होते.


            कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आशोकरावजी भोईटे म्हणाले, की 50 वषीॅने भेटणारे हे माझी विद्यार्थी आज खऱ्या अर्थाने तरूण झाले आहेत. प्रत्येकाच्या जीवनात आई वडिलानतंर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी शाळा असते. अशा शाळेने केलेला गौरव म्हणजे जीवनातील सर्वोच्च आनंद आहे.

             या वेळी प्रमुख पाहुणे नानासाहेब गोरे म्हणाले, जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि शाळेच्या प्रती कृतज्ञता प्रेम व्यक्त करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी विद्यार्थी हे शाळचे वैभव असते त्यांनी शाळेच्या विकासात हातभार लावून आपली शाळा सर्वच गोष्टीत संपन्न केली आहे आणि या पुढेही करावी. नविन येणाऱ्या पिढी पुढे आपला आदर्श ठेवून शाळेप्रती जिव्हाळा ठेवावा सुवर्ण महोत्सवी होणारा हा माजी विद्यार्थी मेळावा दुर्मीळ योगायोग आहे. 50 वषीॅनी भेटणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात हा स्नेह मेळावा सुखाचा आणि समृद्धीचा होणार आहे.

               यावेळेस माजी विद्यार्थ्याचे शिक्षक कुसूर ता.कराड येथील विष्णु सावंत, प्राचार्य एम एस पाटील, पयॅवेक्षक बी आर कुंभार, जेष्ठ पत्रकार पोपटराव झेंडे, बाळकृष्ण मोडक, उत्तम जाधव, एस.टी.पाटील, दत्तात्रय काळुगडे , नंदकुमार पानारे, विजय यादव, गोविंद शेटे, सौ सुंनदा माने यांच्यासह 31 माजी विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते. या कार्यक्रमा प्रसंगी माजी विद्यार्थी भास्करराव पाटील, ललीत ओसवाल, तुकाराम सावंत, डाॅ सुजाता भोईटे यांनी आपल्या आयुष्यातल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्याचा मान्यवराच्या हस्ते स्मृतिचिन्ह व गुलाबाचे फूल देवून सत्कार करण्यात आला.    

            यावेळी 1973 च्या इयत्ता पाचवी पहिल्या बॅचला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल क. भा.पाटील विद्यालय ढेबेवाडी च्या शाळेने या माझी विद्यार्थ्यांसह त्यांच्या नातेवाईकाची सुध्दा ढेबेवाडी बसस्थानकापासून शाळेपर्यंत एक कि. मी.अंतर ढोल ताशे व झांज पथकाच्या गजरात मिरवणूक काढून त्यांना मानवंदनाच दिली. सर्व विद्यार्थ्यांनी फेटे बांधले होते. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांनीही रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्या वाजवून स्वागत केले

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दादाराम सांळुखे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सौ वृषाली निंबाळकर व प्रा सौ दिपाली सावेकर यांनी केले. आभार अनिल पानसकर यांनी मानले. यावेळी शिक्षकवृंद विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यीनि मोठ्या संख्येने आल्या होत्या. 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न