Posts

Showing posts from February, 2024

कलेकडे झुकलेली मराठी भाषा अधिक समृद्ध आहे. - दीपक करंजीकर

Image
मुंबई : (रवींद्र मालुसरे ) - शास्त्राशी जोडलेलया भाषा आणि कलेशी जोडलेलया भाषा यामध्ये मराठी ही भाषा संपूर्णपणे कलेकडे  झुकते. ४८ वर्ण, व्यंजने, त्यातले स्वर, उच्चराधित शब्द त्यातून तयार होणारी बोली यातून तयार होणारे पर्यावरण मराठी भाषेशिवाय कुठेही नाही. त्यामुळे मराठीला मी बेलबुट्टीची भाषा समजतो. भारतावर ७०० वर्षात अनेक आक्रमणे होऊनही हा देश स्वतःची संस्कृती जपत सर्वाना सामावून घेऊन उभा आहे. तसेच मराठीचे झाले आहे.  आपली भाषा ही विस्तृत झाली आहे. मराठीतले अनेक शब्द इंग्रजीमध्ये प्रमाण म्हणून गेले आहेत. त्यामुळे मराठीच्या भविष्याबद्दलचा न्यूनगंड काढून टाका अहंगंड बाळगायला हरकत नाही मात्र आहे तो गंड बाळगायला हरकत नाही. सुंदरतेची आस असणारी महत्वाची देशातली भाषा म्हणजे मराठी भाषा आहे.भाषा हा आपल्या जगण्याचा अपरिहार्य भाग  आहे असे मला वाटते. असे प्रतिपादन विख्यात लेखक, अभिनेते आणि सुजाण विचारवंत दीपक करंजीकर यांनी व्यक्त केले. दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्टस, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाष...

धगधगती मुंबई वर्धापन दिन पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

Image
               सा. धगधगती मुंबई या वृत्तपत्राच्या वतीने चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त दिमाखदार गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्यामध्ये दैनिक महासागर चे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक यांना पत्रकारिता जीवन गौरव पुरस्काराने मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल असे या जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी व्यासपीठावर अभिनेते किरण माने, दिगंबर नाईक खासदार राहुल शेवाळे आरोग्य दूत मंगेश चिवटे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यात अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.   यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राहुल शेवाळे यांनी धगधगती मुंबई अशीच धगधगत राहावी, धारावीतील प्रश्नावर सतत आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे काम संपादक भिमराव धुळप करत आहेत.१४ वर्षे पत्रकारितेचा धर्म पाळून निःपक्षपाती पत्रकारिता करत आहेत. धारावीतील ते शासनाचे एकमेव पत्रकार आहेत. त्यांचे मी अभिनंदन करतो, त्याचबरोबर सर्व पुरस्कार विजेत्यांचेही अभिनंदन करतो. व्यक्तीमुळे पुरस्कार ...

इंडीयन आर्मी मध्ये भरती झालेबद्दल चेतन भरुगडे याचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

Image
ढेबेवाडी/वार्ताहर       मंद्रूळकोळे खुर्द येथील चेतन दिलीप भुरुगडे हा इंडियन आर्मी मध्ये भरती झाला असून याबद्दल त्याचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.       मंद्रूळकोळे खुर्द गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. उमादेवी भोई, उपसरपंच संजय लोहार, ग्रामपंचायत सदस्य सतिश उर्फ बाळासाहेब कदम, सौ. कमल पाटील, सौ. विनाया पाटील, ग्रामसेवक मोहन पवार, रुपेश भोई संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.     यावेळी संजय लोहार म्हणाले चेतन देशसेवेसाठी भरती झाला ही गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे चेतनने इंडियन आर्मी मध्ये उत्कृष्ट काम करून लौकिक वाढवावा. चेतनने कोणतेही भरतीपूर्व प्रशिक्षण न लावता स्वतः मेहनत घेवून केलेले प्रयत्नाला यश आले याचे कौतुक वाटते. हा आदर्श इतरांनी घेवून वाटचाल करावी. अलीकडे गावतून लष्करी सेवेत भरती झालेला हा पाचवा युवक आहे.अशीच मेहनत घेवुन जिद्द चिकाटी ठेवून युवकांनी प्रयत्न ठेवावे.आमचे आपणास नेहमी सहकार्य राहील.       चेतन भूरुगडे म्हणाला लष्करी सेवेत भरती व्हायचे अशी जिद्द ठेवली होती. यासाठी आपर कष्ट घेतले, माझा भाऊ नेव्ही...

सत्यवान मंडलिक यांना कालिदास सन्मान पुरस्कार

Image
मुंबई/प्रतिनिधी                     Helping hands welfare society तर्फे वक्रतुंड सभागृह गणेश मंदिर संस्थान डोंबिवली येथे संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने काही निवडक पुस्तकांना कालिदास सन्मान पुरस्कार देऊन लेखकांना गौरविण्यात आले.                 Helping  hands welfare society तर्फे प्रतिवर्षाप्रमाने याही वर्षी संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त २०२३ साली साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लेखक/कवी यांचा हृद्य सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी लेखक कवी सत्यवान मंडलिक यांना त्यांच्या 'म्हातोबाचा माळ' या पुस्तकासाठी कालिदास सन्मान २०२४ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.                 राज आसनोडकर (कायद्याने वागा चळवळीचे प्रणेते), मनीष पाटील (कोमसाप ठाणे जिल्हा माजी जिल्हा कोषाध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक) या मान्यवरांसोबत चर्चासत्राचा देखील कार्यक्रम पार पडला.       ...

कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या सन्मानाने डाॅ.संदीप डाकवे भारावले

Image
तळमावले/वार्ताहर              शासकीय योजना लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कृषी अधिकारी वेळोवेळी शेताच्या बांधावर जातात. कृषी क्षेत्रातील पुरस्कार मिळाल्याबद्दल थेट विजेत्यांजवळ जावून आपुलकीने सत्कार करणारे अधिकारी मात्र विरळच. असाच प्रसंग नुकताच घडला. कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, मंडळ कृषी अधिकारी सुनील ताकटे, पाटण तालुका कृषी अधिकारी कुंडलिक माळवे, कृषी सहायक ए.बी.पवार व जी.डी.सावंत या अधिकाऱ्यांनी पाटण तालुक्यातील पुरस्कार विजेत्यांचा घरी जावून शाल, श्रीफळ आणि बुके देवून यथोचित सन्मान केला. या सन्मानाने सर्व पुरस्कार विजेते भारावून गेले. यथावकाश शासनाच्या मार्फत दैदिप्यमान सोहळयात विजेत्यांचा सन्मान होईलच परंतू आपुलकीने नाती जोडण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन केल्याचे कृषी अधिकारी वर्गांनी सांगितले.             पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाचा पत्रकारितेचा सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुर...

डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर

Image
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा कृषी विभागाचा पत्रकारितेतील सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे. रुपये 1 लाख 20 हजार, मानपत्र, मानचिन्ह व रु.15 हजार प्रवास भत्ता असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शेतकरी, पत्रकार शेतीमित्र, संशोधक यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मस्त्यव्यवसाय यांच्यावतीने कृषी क्षेत्रातील लिखाणाबद्दल सन 2022 चा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार डाॅ.डाकवे यांना जाहीर केला आहे.          डाॅ.संदीप डाकवे यांनी कृषाीविषयक बातम्या, शेतकरी यशोगाथा, कृषी योजना प्रसारासाठी स्वतःची प्रकाशने,  आणि सोशल मिडीयाचा प्रभावी वापर, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून राबवलेले उपक्रम, यासोबतच विविध समाज माध्यमांचा वापर प्रभावीपणे करत लिखाण केले होते. यासाठी त्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक आत्मा सातारा विकास बंडगर, कृषि उपसंचालक जि.अ.कृ.अ. क...

स्त्रियांचे मानसिक आजार व त्यावरील उपचार यावर काकासाहेब चव्हाण कॉलेजमध्ये कार्यशाळा संपन्न

Image
तळमावले/वार्ताहर                बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण अग्रणी महाविघालय योजना आणि काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले यांच्या संयुक्त विद्यमाने 'अंतर्गत तक्रार निवारण कक्ष ' या समितीच्यावतीने 'स्त्रियांचे मानसिक आजार व आजाराची लक्षणे' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी डॉ.प्राची शिद्रूक साधनव्यक्ती म्हणून उपस्थित होत्या.                 डॉ. प्राची शिद्रूक विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना  म्हणाल्या, आरोग्यम धनसंपदा हे ब्रीद आपण  सांभाळले पाहिजे. तसेच आपल्यावर समाजातून कुटुंबातून जे आघात होत असतात त्या आघातातून आपली मानसिकता तसेच शारीरिक क्षमता चांगली कशी ठेवता येईल याविषयी मार्गदर्शन केले. मुलींनी आहारामध्ये कोणत्या फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्ये दररोज घेणे आवश्यक आहे याचेही मार्गदर्शन त्यांनी केले. एखाद्या मुलीला जर काही शारीरिक अडचणींना सामना करावा लागत असेल तर तिने आपल्या पालकांशी पहिल्यांदा हितगुज करणे आवश्यक आहे.         ...

पोलीस पाटील यांचे मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषण

Image
  मुंबई/प्रतिनिधी                                     पोलीस पाटील यांच्या मानधन वाढीस इतर प्रलंबित मागण्या वाढवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शेंडेवाडी ता. पाटण येथील पोलीस पाटील संतोष शामराव पवार  यांनी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी  आमरण उपोषण सुरू केले असून  या उपोषणास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून पोलीस पाटील यांना साखळी उपोषणाद्वारे पाठिंबा दर्शवला आहे.                             पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मानधन वाढीस इतर सर्व मागण्या संदर्भात देऊनही सध्याचे सरकार याचा गांभीर्थनि विचार करत नाही. तसेच मध्या अगणारे तुटपुंजे ६५00 बार निवेदन आम्हा नियुक्त झालेपासुन आजपर्यंत कधीच वेळेन महिन्याचे पहिन्याला मिळाले नाही. या तुटपूज्या मानधनात कुटुबांचा उदरनिर्वाह करणे शक्य नाही. मुलांना उच्च शिक्षण देता येत नाही. यासाठी शासनाला जाग यावी व शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या ...

शिवरायांचा इतिहास, विचार व शौर्यगाथा तरुणांनी समजून घ्यावी : डाॅ.प्रदीप यादव

Image
तळमावले/वार्ताहर                शिवरायांचा इतिहास, शिवरायांचा विचार, शिवरायांची शौर्याची गाथा आजच्या तरुणांनी खÚया अर्थाने समजून घ्यायला हवी. शिवरायांच्या प्रत्येक कृतीतून दिलेला सामाजिकतेचा आदर्श अंगीकारायला हवा. तीच खरी विचारांची जोपासना होईल. शिवरायंानी जी रणनीती आखली ती खÚया अर्थाने मानवतेचा सुगंध दरवळणारीच होती, असे गौरवोद्गार इतिहास संषोधक प्रा.डाॅ.प्रदीप यादव यांनी काढले. कराड येथील यशवंतराव चव्हाण काॅलेज सायन्समध्ये शिवजयंती आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढाई व्यतिरिकक्त इतिहास याविषयी विचार व्यक्त करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एस.बी.केंगार होते. डाॅ.प्रदीप यादव म्हणाले, भारतीय इतिहासातील शूर पराक्रमी, सहिष्णू, आदर्श, श्रीमंत योगी राजा म्हणून ओळखले जाणारे पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज होत. ज्यांनी विजापूरचे आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याची मोगलशाही अशी विविध शाही असतानासुध्दा त्यांच्याशी मुकाबला करत स्...

चिमुकल्या सांचीचा बोरन्हाण सोहळा अक्षरसंस्कारातून संपन्न

Image
तळमावले/वार्ताहर शिशुसंस्कार संक्रातीला लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची पारंपारिक पध्दत आहे. बदलत्या ऋतुची बाधा मुलांना होवू नये व या काळात असलेली फळे मुलांनी खावीत हा हेतू यामागे असतो. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील कु.सांची रेश्मा संदीप डाकवे या चिमुकलीचा दुसरा बोरन्हाण समारंभ अक्षरसंस्कारातून संपन्न झाला. या समारंभासाठी अभंगाच्या ओळींची कॅलिग्राफी असणारे पतंग व पोस्टर्स डेकोरेशनासाठी वापरले होते. ही कॅलिग्राफी सांचीचे वडील विश्वविक्रमवीर चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी केली होती. यापूर्वी सांचीच्या प्रथम बोरन्हाणादिवशी महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, जि.प.केंद्रशाळा काळगांव ला महापुरुषांच्या प्रतिमांचे वितरण केले होते. महिलांनी प्रथमतः सांचीला औक्षण केले. त्यानंतर बोरे, कुरमुरे, भुईमुगाच्या शेंगा, तिळगुळ, यासह लहान मुलांना आवडणारे चाॅकलेट, बिस्कीट, जेम्स गोळया अशा पदार्थांनी सांचीला बोरन्हाण घातले. त्यानंतर डाकवे परिवाराने मुलांना खाऊ वाटप केले. हा क्षण स्पंदन डाकवे, ओवी पोळ, सौरभ नलवडे, प्रेरणा माने, अभिजीत जाधव या मुलांनी खूप एन्जाॅय केला. दरम्यान, मुलांना पेन्सिलच...

जे. एम.लोहार सर यांनी क्रीडा शिक्षक म्हणून अतिशय चांगले काम केले

Image
ढेबेवाडी                   जीवनात प्रामाणिक केलेली सेवा कधी वाया जात नाही त्याचे फळ निश्चित मिळते. अत्यंत कठीण परिस्थितीत गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या  जे.एम. लोहार सर यांनी चांगले काम केले. संस्थापक प्रकाश पाटील आबा यांनी दिलेल्या संधीचा चांगला फायदा घेऊन त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवला व एक उत्तम क्रीडाशिक्षक म्हणून अतिशय चांगले काम करून चागले खेळाडू तयार केले. जे. एम्.लोहार सर यांनी एक क्रीडाशिक्षक म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वातून घालून दिलेला आदर्श दिशादर्शक आहे असे प्रतिपादन कला वाणिज्य व सायन्स कॉलेज पलसचे प्रा.कविवर्य संतोष काळे यांनी केले.      न्यू  इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आचरेवाडी ता.पाटण येथे जे. एम. लोहार सर यांचा सेवापूर्ती समारंभ व इयत्ता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यावर्धिनी संस्थेचे संस्थापक सचिव माजी प्राचार्य प्रकाश पाटील आबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते विशाल पवा...

चंद्रकांत चाळके यांच्या वाढदिवसानिमित्त् स्पंदन एक्सप्रेस ने केलेला अंक वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा..

Image
 चंद्रकांत चाळके यांच्या वाढदिवसानिमित्त् स्पंदन एक्सप्रेस ने प्रकाशित केलेला अंक वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा. https://heyzine.com/flip-book/f2275f8635.html

वांगव्हॅली पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी डाॅ.संदीप डाकवे यांची निवड

Image
तळमावले/वार्ताहर      ढेबेवाडी (ता.पाटण) येथील वांगव्हॅली पत्रकार संघाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. यावेळी वांगव्हॅली पत्रकार संघ ढेबेवाडीच्या अध्यक्षपदी डाॅ.संदीप डाकवे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी तरुण भारतचे नितीन बेलागडे, सचिवपदी प्रभातचे विजय सुतार तर कार्याध्यक्षपदी पुण्यनगरीचे प्रमोद पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. डाॅ.संदीप डाकवे हे गेली 17 वर्षापासून पत्रकारितेमध्ये काम करत आहेत. उत्कृष्ट पत्रकारितेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांचा पुरस्कार देवून 5 वेळा सन्मान केला आहे. लेखनाबरोबरच त्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे.  यावेळी दै.ऐक्यचे संजय लोहार, पुढारीचे पत्रकार तुषार देशमुख, जेष्ठ पत्रकार पोपटराव झेंडे, दै.कृष्णाकाठ चे संपादक चंद्रकांत चव्हाण, नितीन बेलागडे, विजय सुतार, हरीष पेंढारकर, अमोल चव्हाण, प्रमोद पाटील, पोपटराव माने, साप्ताहिक कुमजाई पर्वचे संपादक प्रदिप माने उपस्थित होते.   गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत वांगव्हॅल...

ढेबेवाडी हायस्कूल मध्ये 62 वर्षांनी भेटले विद्यार्थी

Image
 ढेबेवाडी/पोपटराव झेंडे                      1973 सालच्या इयत्ता 5 वी च्या बॅचला 50 वर्षे पूर्ण झाल्याचे सुवर्ण महोत्सवी वर्षांचे औचित्य साधत सुमारे 62 वर्षांनी माजी विद्यार्थ्यी स्नेह मेळाव्याने ज्या शाळेत शिकून मोठे झाले त्याच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व जुनियर कॉलेज ढेबेवाडी शाळेत एकमेकाना भेटल्या ने सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला.                या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी नानासाहेब गोरे यांनी भुषवले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ आशोकरावजी भोईटे हे होते.             कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आशोकरावजी भोईटे म्हणाले, की 50 वषीॅने भेटणारे हे माझी विद्यार्थी आज खऱ्या अर्थाने तरूण झाले आहेत. प्रत्येकाच्या जीवनात आई वडिलानतंर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी शाळा असते. अशा शाळेने...

‘स्पंदन आदर्श सरपंच’ पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन

Image
तळमावले/वार्ताहर                     पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन एक्सप्रेस या वार्तापत्राच्यावतीने सरपंचांना त्यांनी केलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामाकरिता स्पंदन आदर्श सरपंच सन्मान देवून गौरविण्याचे ठरविले आहे. यामध्ये सरपंचांनी त्यांच्या कालावधीत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येईल. त्याचबरोबर त्यांच्या ह्या कामामुळे त्यांच्या गावामध्ये काय बदल झाला याचीही नोंद घेतली जाणार आहे. या पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन स्पंदन एक्सप्रेस वार्तापत्राचे संपादक डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे.                      तरी सरपंचांनी या पुरस्कारासाठी नामांकने सादर करावीत. जेणेकरून आपल्या आदर्श कामाला प्रसिद्धी मिळेल, त्याचबरोबर या कामामुळे इतर ग्रामपंचायत, सरपंच, सदस्य यांना प्रोत्साहन मिळेल व ते अधिक उत्साहाने कामास सुरुवात करतील. या पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत रविवार दि.31 मार्च, 2024 आहे ...

यशवंतराव चव्हाण पुरस्कार समाजातील घटकांसाठी दिशादर्शक ठरणारा ठरेल : मनोज सानप

Image
 ठाणे/वार्ताहर                     साप्ताहिक यशवंतनिती या वृत्तपत्राच्या माध्यमातून राबवणारा जाणारा यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या घटकांसाठी दिशादर्शक ठरणारा ठरेल असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले. साप्ताहिक यशवंतनिती व यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई आयोजित यशवंतराव चव्हाण पुरस्कार पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन वाशी नवी मुंबई याठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.                     यावेळी मेघना काकडे माने-समाजसेविका मुंबई, पुजा कल्याण काळे, उपनिरीक्षक खारघर पोलिस ठाणे, आर‌. के बडवाईक- निरीक्षक धर्मादाय कार्यालय वरळी, संजय बदियाणी- प्रसिद्ध उद्योगपती, चंद्रकांत चाळके-चेरअमन साईराज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई,  सुभाष बावडेकर कुटुंबप्रमुख अष्टविनायक परिवार, प्रमोद देशमाने- चेअरमन महात्मा बसवेश्वर सहकारी पतसंस्था शिवडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. ...

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण मतदारसंघासाठी 6 कोटी 72 लक्ष 43 हजार रुपयांचा निधी मंजूर

Image
दौलतनगर/वार्ताहर             पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून लघु पाट बंधारे विभागाचे वाशिम पॅटर्न,जलयुक्त शिवार योजना,आमदारांचा स्थानिक विकास निधी,डोंगरी विकास निधी,जि.प.स्वनिधी व दलित वस्ती सुधार योजना या विविध योजनांतर्गत 36 कामांसाठी 06 कोटी 72 लक्ष 43 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शेती विषयक पाण्याची समस्या दूर होऊन शेतकर्यांचे शेतातील पिकाला पाणी मिळण्याचे उद्देशाने लघु पाट बंधारे विभागांतर्गत वाशिम पॅटर्न ही संकल्पना राबविण्याची सूचना अधिकार्यांना केल्या होत्या. त्यानुसार सन 2023-24 चे जिल्हा वार्षिक आराखडयांतून लघु पाट बंधारे विभागांतर्गत वाशिम पॅटर्न राबविण्याच्या कामांकरीता 79.41 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये पाडळोशी पाझर तलाव दुरुस्ती 17.27 लक्ष, खबालवाडी वरची ग्रामतलाव दुरुस्ती ...

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या उंडाळे येथील बहूउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

Image
उंडाळे/वार्ताहर                शेतकऱ्यांना पिकाची उत्पादकता व उत्पादन वाढीसाठी कृषिविषयक अद्ययावत माहिती मिळणे गरजेचे आहे. उंडाळे येथील बहूउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येईल. असा विश्वास व्यक्त करून माजी मंत्री स्व.विलासराव पाटील यांनी कायम लोकहितासाठी कार्य केले, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केला.                उंडाळे ता.कराड येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बहूउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रयत सह.साखर कारखान्याचे चेअरमन ॲड.उदयसिंह पाटील, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, मंडल कृषी अधिकारी शितल नांगरे, उदयआबा पाटील, सचिन काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.                सारंग पाटील म्हणाले, सहकारी चळवळीला दिशा देणार् ‍ या स्व.विलासराव पाटील...

संजय देसाई यांची सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड

Image
तळमावले/वार्ताहर                कुंभारगांव, ता.पाटण या गावाचे सुपुत्र संजय दादासोा देसाई यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी कुंभारगावचे सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा शिक्षण व अर्थ समिती सभापती असा प्रवास केला आहे. याशिवाय विविध राजकीय पदाची धुरा देखील त्यांनी समर्थपणे पेलली आहे. सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

चेअरमन यशराजदादा देसाई यांच्याकडून लग्नसोहळा व पूजाविधी आटोपून कारखान्याच्या कामकाजास सुरुवात

Image
दौलतनगर/वार्ताहर                लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराजदादा देसाई यांचा शुभविवाह 28 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर पूजाआदी कार्यक्रम आटोपून आजपासून त्यांनी कारखाना कार्यालयात उपस्थित राहून कामाकाजास सुरुवात केली. यावेळी कारखान्याच्या पदाधिकारी व कर्मचारी वर्गाने मा. यशदादांचे अत्यंत आनंदात स्वागत करून विवाहप्रित्यर्थ त्यांना शुभेच्छा दिल्या.                  खरं तर सोशल मीडियाच्या आजच्या जगात विवाह समारंभाचे अनेक ट्रेण्ड्स पाहायला मिळत असतात. विवाह सोहळ्यापूर्वी आणि तो झाल्यानंतरही बरेच दिवस काही ना काही इव्हेंट घडवून विवाहाच्या मंगलकार्याचा अनावश्यक जल्लोष केला जातानाही आपण पाहात असतो. मात्र, या साऱ्याला दूर सारून मा. यशराज दादांसारख्या युवा नेतृत्वाकडून कर्तव्य आणि जबाबदारीच्या भावनेतून जनसेवेला प्राधान्य दिले जाते, तेव्हा आश्वासक वाटते. ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ सारख्या इंग्रजी पुस्तकातून डिजिटल जगातील आभासी जगण्यापेक्षा आपल्या व...

पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध धार्मिक व पर्यटन स्थळांचा होणार विकास

Image
दौलतनगर/वार्ताहर                      पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील दौलतनगर येथील श्री गणेश मंदिर, मरळी येथील श्री निनाईदेवी मंदिर,येराडवाडी येथील रुद्रेश्वर मंदिर,गुरेघर येथील वाघजाई मंदिर,डावरी येथील सिध्देश्वर मंदिर, वेताळवाडी येथील वरद विनायक मंदिर,सांगवड येथील श्री सिध्देश्वर मंदिर,आटोली येथील खडकची वाघजाई मंदिर, मंद्रुळहवेली येथील निनाई मंदिर, पाणेरी येथील वाल्मिकी मंदिर, चोपदारवाडी येथील सिध्देश्वर मंदिर, वसंतगड येथील जनार्दन स्वामी महाराज मठ व वस्ती साकुर्डी ता.कराड येथील भवानी माता मंदिर या धार्मिक व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांचा विकास पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदार संघातील शिफारस केलेल्या  पर्यटन विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने पारित केला असल्याची माहिती...

तळमावलेच्या काकासाहेब चव्हाण महाविद्यालयास नँक "B++"(2.77) मानांकन प्राप्त

Image
तळमावले/वार्ताहर               राष्ट्रीय पातळीवरील 'नॅक' पीअर टीम (त्रिसदस्यीय समिती) कडून तळमावले येथील काकासाहेब चव्हाण काॅलेजला नँक "B++"(2.77) मानांकन मिळाले आहे. याबद्दल सर्व स्तरांतून काॅलेजचे अभिनंदन होत आहे.            थोर देशभक्त स्वातंत्र्यसेनानी बी.एन.तथा काकासाहेब चव्हाण व महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या त्यागातून १९६९ साली काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले या संस्कार केंद्राची स्थापना झाली.               दि.१६ जाने व १७ जाने २०२४ रोजी राष्ट्रीय पातळीवरील 'नॅक' पीअर टीम (त्रिसदस्यीय समिती)  मूल्यांकनासाठी आपल्या महाविद्यालयात आली होती. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिंगबर शिर्के, कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव सौ.शुभांगीताई गावडे,  प्रशासकीय सहसचिव डॉ.राजेंद्र शेजवळ, अर्थ सहसचिव प्राचार्य एस.एम. गवळी, मुख्य ...