यशवंतराव चव्हाण पुरस्कार समाजातील घटकांसाठी दिशादर्शक ठरणारा ठरेल : मनोज सानप


 ठाणे/वार्ताहर

                साप्ताहिक यशवंतनिती या वृत्तपत्राच्या माध्यमातून राबवणारा जाणारा यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या घटकांसाठी दिशादर्शक ठरणारा ठरेल असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले. साप्ताहिक यशवंतनिती व यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई आयोजित यशवंतराव चव्हाण पुरस्कार पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन वाशी नवी मुंबई याठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

                यावेळी मेघना काकडे माने-समाजसेविका मुंबई, पुजा कल्याण काळे, उपनिरीक्षक खारघर पोलिस ठाणे, आर‌. के बडवाईक- निरीक्षक धर्मादाय कार्यालय वरळी, संजय बदियाणी- प्रसिद्ध उद्योगपती, चंद्रकांत चाळके-चेरअमन साईराज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई,  सुभाष बावडेकर कुटुंबप्रमुख अष्टविनायक परिवार, प्रमोद देशमाने- चेअरमन महात्मा बसवेश्वर सहकारी पतसंस्था शिवडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

            यावेळी मनोज सानप म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा उभा केला आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकास योगदानाबद्दल त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. अशा थोर विकास पुरुषाच्या नावाने दिला जाणारा विविध क्षेत्रातील पुरस्कार लोकांना ऊर्जा देणारा ठरेल आणि तो उपक्रम साप्ताहिक यशवंतनितीच्या माध्यमातून होत आहे याचं मला कौतुक वाटते. हे पुरस्कार देत असताना विविध क्षेत्रातील मान्यवरांचे गौरव केला आहे. भावी वाटचालीसाठी पुरस्काराच्या माध्यमातून लोकांना काम करण्याचं बळ मिळेल तसेच लोकांना प्रेरणादायी ठरेल असं कार्य त्यांच्या समाजात हातुन घडत राहील. यशवंतराव चव्हाण यांच्या बद्दल मला प्रचंड आदर असल्यामुळे त्यांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करताना मला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवलं याचा मला आनंद आहे. प्रत्येक वर्षी अशा समाजातील तळागाळात काम करणाऱ्या लोकांना निवडून पुरस्काराची थाप त्यांच्या पाठीशी उभी करावी यातून समाजात चांगले बदल घडत राहतील. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे काम त्यांच्या प्रगतीचे काम पोचण्यासाठी सर्वांनी काम प्रयत्नशील रहावे.

            यावेळी मेघना काकडे माने, किसन भाष्टे, सुभाष बावडेकर, पुजा काळे स्वाती पाटील,  संतोष साठे -पाटील, आदींची भाषणे झाली.

                ऋतुजा राजेंद्र गायकवाड, सायली मिरजकर, प्रशांत पाचुपते, महेश हूकरे, अमरदीप करपे, संतोष पवार, भारती कामठे, प्रतिभा शिवशरण, पुजा काळे, मेघना काकडे माने, वृषाली दबडे, राज साळुंखे, संजय बदियाणी, संदिप सावंत, महेश काटकर, रमेश पाटील, जगदीश माने, संगिता शेडगे, प्रयागम गडकिल्ले जागृती टीम नवी मुंबई, संदिप निकम, रेणुका पगारे, विद्याराणी सकटे, निशिता खांडके, दैवशीला मोहिते, दिपाली खोत, किसन भाष्टे, विजय होटकर, संतोष साठे पाटील, संगिता वरेकर, युवा प्रतिष्ठान वरेकरवाडी, मोहिनी दुर्गे, अंकुश दिसले, विद्या महासुर्णेकर, संतोष शिरवले, हेरंब प्रधान, वर्षा पोपळकर या मान्यवरांना जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साप्ताहिक यशवंतनितीचे संपादक संजय किसन सावंत यांनी केले. भरत गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न