शिवरायांचा इतिहास, विचार व शौर्यगाथा तरुणांनी समजून घ्यावी : डाॅ.प्रदीप यादव
तळमावले/वार्ताहर
शिवरायांचा इतिहास, शिवरायांचा विचार, शिवरायांची शौर्याची गाथा आजच्या तरुणांनी खÚया अर्थाने समजून घ्यायला हवी. शिवरायांच्या प्रत्येक कृतीतून दिलेला सामाजिकतेचा आदर्श अंगीकारायला हवा. तीच खरी विचारांची जोपासना होईल. शिवरायंानी जी रणनीती आखली ती खÚया अर्थाने मानवतेचा सुगंध दरवळणारीच होती, असे गौरवोद्गार इतिहास संषोधक प्रा.डाॅ.प्रदीप यादव यांनी काढले.
कराड येथील यशवंतराव चव्हाण काॅलेज सायन्समध्ये शिवजयंती आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढाई व्यतिरिकक्त इतिहास याविषयी विचार व्यक्त करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एस.बी.केंगार होते.
डाॅ.प्रदीप यादव म्हणाले, भारतीय इतिहासातील शूर पराक्रमी, सहिष्णू, आदर्श, श्रीमंत योगी राजा म्हणून ओळखले जाणारे पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज होत. ज्यांनी विजापूरचे आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याची मोगलशाही अशी विविध शाही असतानासुध्दा त्यांच्याशी मुकाबला करत स्वराज्याची आस बाळगणारा जाणता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे बघितले जाते. शिवरायांचे सामथ्र्य कीर्ती ही दैदीप्यमान अषीच होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डाॅ.बी.ई.महाडीक यांनी केले. प्रा.डाॅ.एस.डी. जाधव यांनी आभार मानले.
याप्रसंगी उपप्राचार्य एस.एल.महामुनी, पर्यवेक्षक एस.एन.गाडे, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी दत्त चैक येथील शिवतीर्थावरुन शिवज्योत प्रज्वलित प्रज्वलित करुन ती कराडमधून दौड करत महाविद्यालयामध्ये आणण्यात आली. शिवगर्जना करत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.




Comments
Post a Comment