जे. एम.लोहार सर यांनी क्रीडा शिक्षक म्हणून अतिशय चांगले काम केले

ढेबेवाडी

               जीवनात प्रामाणिक केलेली सेवा कधी वाया जात नाही त्याचे फळ निश्चित मिळते. अत्यंत कठीण परिस्थितीत गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या  जे.एम. लोहार सर यांनी चांगले काम केले. संस्थापक प्रकाश पाटील आबा यांनी दिलेल्या संधीचा चांगला फायदा घेऊन त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवला व एक उत्तम क्रीडाशिक्षक म्हणून अतिशय चांगले काम करून चागले खेळाडू तयार केले. जे. एम्.लोहार सर यांनी एक क्रीडाशिक्षक म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वातून घालून दिलेला आदर्श दिशादर्शक आहे असे प्रतिपादन कला वाणिज्य व सायन्स कॉलेज पलसचे प्रा.कविवर्य संतोष काळे यांनी केले.

     न्यू  इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आचरेवाडी ता.पाटण येथे जे. एम. लोहार सर यांचा सेवापूर्ती समारंभ व इयत्ता दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यावर्धिनी संस्थेचे संस्थापक सचिव माजी प्राचार्य प्रकाश पाटील आबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार भैया, राष्ट्रवादी काँग्रेसचे शामराव पुजारी सर, संस्थेच्या उपाध्यक्ष माजी प्राचार्या सौ उज्वला पाटील मॅडम, प्रा.प्रकाश सावंत सर, माजी कृषी अधिकारी सूर्यकांत पाटील, रयत कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील, आनंदराव देसाई माजी सरपंच बबन सावंत, रघुनाथ लकडे, आंनदा नायकवडी,  श्रीकांत आचरे, उपसरपंच जालिंदर कोळगे, एम.बी. आचरे, सौ.निताताई लोहार, भाजपचे दत्ता कारंडे, संजय चव्हाण, शिरीष पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

        प्रा. संतोष काळे पुढे म्हणाले आचरेवाडी विद्यालयाचा परिसर पाहून भारावून गेलो प्रकाश पाटील आबा यांचे हे काम पाहून हे ग्रामीण भागात जणू शांतिनिकेतन आहे असे वाटले आबांसारखी संवेदनशील माणसं इतिहास घडवतात. इयत्ता दहावी आणि बारावीच्या मुलांनी परीक्षेला चांगली तयारी करून सामोरे जावा हा काळ स्पर्धेचा आहे यामध्ये टिकून राहण्यासाठी जिद्द चिकाटी आणि परिश्रम ठेवा जीवनात पुस्तकांची सलगी करा याचा फायदा होतो आणि आपली संगत कोणाची आहे याचाही जीवनावर परिणाम होत असतो म्हणून चांगल्या गोष्टींच्या संगतीत राहा.

       प्रकाश पाटील आबा म्हणाले जे. एम.लोहार सर शांत संयमी व सरळ मार्गी व ॲक्टिव्ह क्रीडा शिक्षक आहेत. शाळा स्थापनेपासून त्यांनी या शाळेत अतिशय चांगले काम केले आणि ते आता सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना त्यांच्या चांगल्या कामाची दुवा निश्चित राहील.ही शाळा आत्याधुनिक सर्व सोयीनियुक्त कशी राहील यासाठी माझे प्रयत्न असतात.यासाठी मी माझी सर्व ताकद वापरत आलो आहे. माध्यमिक शिक्षणाबरोबर या विभागातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक सायन्स वाणिज्य कला या तिनी फॅकल्टीचे दालन खुले केले.याचा या परिसरातील विद्यार्थ्यांना चांगला फायदा होत आहे या बाबीचा मनोमन आनंद वाटतो.असे ते म्हणाले.

       जे एम लोहार सर म्हणाले आचरेवाडी शाळेत काम करण्याची संधी मला प्रकाश पाटील आबा यांनी दिली हा माझ्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला. इथून माझे आयुष्य बदलत गेले.आणि जीवनातील हिरवळ चालू झाली.आबा म्हणजे मला माझ्या जीवनात मिळालेला परीस आहे यामुळे जीवनाचे सोने झाले.मी विद्यालयात काम करताना तन - मन लावून प्रामाणिक काम केले. माझ्या कामाची पोहच विद्यार्थी चांगले घडत गेले या मधून मिळत राहील माझे खेळाडू भारतीय लष्कर व पोलीस सेवेत भरती झाले याचा सार्थ अभिमान वाटतो.

       यावेळी प्रा.प्रकाश सावंत, रमेश लोंढे सर, यांची ही भाषणे झाली तर धनश्री आचरे, साक्षी मस्कर, प्राजक्ता भावके, सायली घराळ, दीक्षा मोहिते यांनी मनोगते व्यक्त केली.प्राचार्य बबन साबळे यांनी प्रास्ताविक केले, संजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले, प्रकाश बल्लाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमास ग्रा प सदस्य नारायण सावंत, मारुती सावंत, सौ.सुनंदा पवार, सौ.सुनिता आचरे, राजाराम नांगरे, दत्ता मुटल, मारुती आचरे, दत्ता सावंत, दिलीप सावंत, दत्ता लोहार, पांडुरंग लोहार, बाजीराव लोहार, सागर लोहार, दिलीप सावंत, प्रकाश महाजन ग्रामस्थ माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न