इंडीयन आर्मी मध्ये भरती झालेबद्दल चेतन भरुगडे याचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार

ढेबेवाडी/वार्ताहर

      मंद्रूळकोळे खुर्द येथील चेतन दिलीप भुरुगडे हा इंडियन आर्मी मध्ये भरती झाला असून याबद्दल त्याचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

      मंद्रूळकोळे खुर्द गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. उमादेवी भोई, उपसरपंच संजय लोहार, ग्रामपंचायत सदस्य सतिश उर्फ बाळासाहेब कदम, सौ. कमल पाटील, सौ. विनाया पाटील, ग्रामसेवक मोहन पवार, रुपेश भोई संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी संजय लोहार म्हणाले चेतन देशसेवेसाठी भरती झाला ही गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे चेतनने इंडियन आर्मी मध्ये उत्कृष्ट काम करून लौकिक वाढवावा. चेतनने कोणतेही भरतीपूर्व प्रशिक्षण न लावता स्वतः मेहनत घेवून केलेले प्रयत्नाला यश आले याचे कौतुक वाटते. हा आदर्श इतरांनी घेवून वाटचाल करावी. अलीकडे गावतून लष्करी सेवेत भरती झालेला हा पाचवा युवक आहे.अशीच मेहनत घेवुन जिद्द चिकाटी ठेवून युवकांनी प्रयत्न ठेवावे.आमचे आपणास नेहमी सहकार्य राहील.

      चेतन भूरुगडे म्हणाला लष्करी सेवेत भरती व्हायचे अशी जिद्द ठेवली होती. यासाठी आपर कष्ट घेतले, माझा भाऊ नेव्ही मध्ये सेवेत आहे त्याचेही मला महत्वाचे मार्गदर्शन लाभले.देश सेवेसाठी भरती झाल्याचा मला अतिशय आनंद वाटतो आहे.

      मोहन पवार यांनी स्वागत केले रुपेश भोई यांनी आभार मानले.



Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न