तळमावले काॅलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचा समारोप

तळमावले/वार्ताहर

           तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचा समारोप मौजे तारुख या ठिकाणी झाला. याप्रसंगी प्राचार्य आर.के.भोसले (माजी सहसचिव प्रशासन, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी काॅलेजचे प्राचार्य डॉ.अरूण गाडे तर सचिन कुराडे (लोकनियुक्त सरपंच तारूख), सुनील पाटील (उपसरपंच, तारूख), विक्रमराज पाटील (उपाध्यक्ष, तंटामुक्ती समिती तारुख), नितीन कुराडे (अध्यक्ष, ज्योतिर्लिंग विकास मंडळ तारुख), सचिन कुराडे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती जि.प.शाळा), लक्ष्मण लोकरे, सुरज सागरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            कु.अंकिता पवार, कु.सुस्मीता वरेकर, चि.संदेश पवार (स्वयंसेवक), राजेंद्र जाधव (ग्रामपंचायत सदस्य तारुख) व सचिन कुराडे (सरपंच तारूख) यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सिनियर व ज्यु.रा.से.यो प्रकल्प अधिकारी, सदस्य, कर्मचारी या सर्वांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  प्रास्ताविक प्रा.सौ.ज्योती बाऊचकर, अहवाल वाचन प्रा.महेश चव्हाण, सुत्रंसचालन प्रा.सचिन पुजारी यांनी केले.कार्यक्रमास स्वयंसेवक, जि.प.प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग