प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्था ठाणे संस्थेच्या वतीने फुटपाथ वरील गरजूना ब्लॅंकेट वाटप


मुंबई/प्रतिनिधी

            संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी 26 जानेवारीच्या दिवशी  ठाणे,मुंबई, नवी मुंबई परिसरातील स्टेशन तसेच फूटपाथवर कडाक्याची थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या गरजू गरीब लोकांना ब्लॅंकेट, लहान मुलांचे स्वेटर वाटप केले जाते.सालाबादप्रमाणे यावर्षीही   भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2024 रोजी वाटप करण्यात आले.

            ह्या ड्राईव्ह मधून आम्ही 60 ते 70 गरीब गरजू लोकांना ब्लॅंकेट वाटप केले.त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपण सर्वांनी जी सामाजिक बांधिलकी जपून जी मदत केली त्याचे समाधान लाभले. संस्थेचे हे ब्लॅंकेट वाटपाचे 5 वे आहे.या उपक्रमांस संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आंनद कदम, खजिनदार विजय कदम, गणेश कदम, आबास कदम आणि प्रताप कदम  आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संस्थेच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी होण्यासाठी 8692814790 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न