पत्रकार दिनानिमित्त शिवसमर्थ च्या वतीने पत्रकारांचा सन्मान
तळमावले/वार्ताहर
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दि शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटी व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने संस्थेच्या तळमावले येथील मुख्य कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, देवबा वायचळ सर, रविंद्र माने, विद्या माने व संस्थेचे अन्य अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी शिवसमर्थच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि स्व.मिनाताई ठाकरे यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि स्व.मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांना हार घालून, पुजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रविंद्र माने, संदीप डाकवे व इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
तसेच पत्रकार दिनानिमित्त रविंद्र माने, बाळासाहेब रोडे, पोपट झेंडे, विजय सुतार, संदीप डाकवे यांचा शाल, श्रीफळ व बुके देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप डाकवे यांनी तर आभार प्रदर्शन पुजा देशमुख यांनी केले.


Comments
Post a Comment