Posts

Showing posts from January, 2024

मल्हारपेठच्या पिता-पुत्रांचे काव्यवाचन आणि वक्तृत्व स्पर्धेत यश

Image
कराड/प्रतिनिधी             नांदगाव च्या द्वारकाबाई सुकरे प्रतिष्ठान तर्फे झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धेत मल्हारपेठ च्या प्रतीक पवार व दादासाहेब पवार यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले.           वक्तृत्व  स्पर्धेत प्रतीक पवार याने "जागर स्त्री शिक्षणाचा"  विषय मांडला व आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. दादासाहेब पवार यांनी खुल्या गटात "संगणक काळाची गरज"  विषय प्राप्त केला. तसेच काव्य विभागात प्रतीक ने स्वच्छतेचा ध्यास ही कविता उत्कृष्ट रित्या सादर केली. दादासाहेब पवार यांनी "बाबा माग नाय हटायचं" ही कविता उत्कृष्ट रित्या सादर केली - दोघांनीही वक्तृव व काव्य क्षेत्रात उज्ज्वल यश प्राप्त केले आहे.         पारितोषिक वितरण समारंभ  कोटा  अकॅडमी कराड च्या संस्थापिका सौं मंजिरी  खुस्पे,  प्राचार्या सौं.जयश्री पवार प्रमिलाताई पॉलीटेकनिक कराड चे विजय तोडकर यांच्या हस्ते व दक्षिण मांड व्हॅली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वि.तू . सुकरे, सचिव एस.सुकरे, संजय घ...

घरचे मंगलकार्य आटोपताच पालकमंत्री शंभूराज देसाई दुसऱ्या दिवसापासून कामात व्यग्र !

Image
मंगळवारी विविध प्रश्नांबाबत आढावा बैठका घेऊन जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश                     सातारा (३० जानेवारी २०२४) : सुपुत्र यशराज देसाई यांच्या विवाह कार्यानिमित्त गेले चार दिवस कौटुंबिक आघाडीवर व्यग्र राहिलेले पालकमंत्री शंभूराज देसाई मंगळवारपासून पुन्हा सक्रिय झाले. कुटुंबात दीर्घ कालावधीनंतर संपन्न झालेले मंगलकार्य आटोपताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी तातडीने जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत प्रशासनाच्या बैठका घेऊन आवश्यक ते निर्देश दिले. कौटुंबिक जबाबदारीबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कर्तव्य बजावण्यात कोणतीही कसर न राखणारे शंभूराज देसाई यांच्या क्रियाशील नेतृत्वाबद्दल जिल्हावासीयांकडून कौतुक व्यक्त केले जात आहे.                  पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शिंदे-देसाई कुटुंबात दीर्घ कालावधीनंतर रविवारी, २८ जानेवारी रोजी सनईचौघडे वाजले. त्यांचे सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांचा शुभविवाह द...

ग्रामपंचायतीने पवनचक्क्यांना क्रमांक देऊन त्यांचे जिओ टॅगिंग करावे - - ना.शंभूराज देसाई

Image
पाटण/प्रतिनिधी                   पाटण तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये पवनचक्की उभ्या आहेत, त्या संबंधित कंपन्यांकडून ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या कराबाबतची आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. पाटण तालुक्यात १,०६२ पवनचक्क्यांची नोंद असून उभारण्यात येणाऱ्या प्रत्येक पवनचक्कीची नोंद कटाक्षाने झालीच पाहिजे, याबाबत यंत्रणांनी दक्षता घ्यावी. ग्रामपंचायतीने पवनचक्क्यांना क्रमांक देऊन त्यांचे जिओ टॅगिंग करावे, असे निर्देश यावेळी दिले. तसेच पवनचक्की कंपन्यांनी करचुकवेगिरी करू नये, यासाठी संबंधित पवनचक्क्यांमधून किती विद्युतनिर्मिती होते याची तपासणी करण्यात यावी. कर थकबाकी असणाऱ्या कंपन्यांना अंतिम नोटीस देऊन विहीत मुदतीत भरणा न झाल्यास कारवाई करावी व थकबाकीदारांकडून व्याजासह वसुली करण्यात यावी, अशाही सूचना यावेळी दिल्या.                यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अप्पर जिल्हाधिक...

प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

Image
डिजिटल  मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर येथील महाअधिवेशनात ग्वाही  कोल्हापूर/ प्रतिनिधी  प्रिंट  मिडिया व  डिजिटल मिडिया  या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही संरक्षणासाठी समाज कल्याणासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून कार्यरत राहुन समाजाला न्याय मिळवून द्यावा, डिजिटल  मिडिया क्षेत्राला प्रिंट मिडिया प्रमाणे स्वंतत्र दर्जा देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांनी व्यक्त केले, कोल्हापूर श्री सिद्धगिरी कणेरी मठ येथे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार   संघटनेचे दुसरे महाअधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे दोन हजार हजार डिजिटल  मिडिया   क्षेत्रातील संपादक पत्रकार  प्रतिनिधी उपस्थित होते.  या अधिवेशनासाठी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती.  प्रारंभी अधिवेशनाचे उदघाटन    करवीर नगरीचे  शाहू महाराज छत्रपती ,राज्याचे  उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रक...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत यशराज देसाई यांचा शाही विवाह सोहळा संपन्न

Image
शाही विवाह सोहळा जिल्ह्यासाठी ठरला अविस्मरणीय..! दौलतनगर /प्रतिनिधी  :                सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई    यांचा ऐतिहासिक शाही विवाह सोहळा शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री ना नारायण राणे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ना.अजित पवार तसेच श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह राज्य मंत्री मंडळातील मंत्री,खासदार आमदार यांच्यासह राज्यातील, जिल्ह्यातील तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील लाखो जनसमुदायांच्या उपस्थित संपन्न झाला.दरम्यान हा शाही विवाह सोहळा जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरला.पाटण मतदारसंघात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पणतू,श्रीमती विजयादेवी व स्व. शिवाजीराव देसाई यांचे नातू व सौ. स्मिता देवी आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. शंभूराज शिवाजीराव देसाई यांचे ज्येष्ठ सुपुत्र   आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चि.   यशराज    यांचा श...

आरोग्यिता तर्फे अनवानी विध्यार्थ्यांना शूज वाटप

Image
कराड/वार्ताहर           कराड तालुक्यातील पाचुंद,मेरवेवाडी, वाघेरी, कणसेमळा,चिंचमळा या ठिकाणाहून सदाशिवगड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यामंदिर हजारमाची, सदाशिवगड या शाळेत अनवानी येणाऱ्या विध्यार्थ्यांना ब्रँडेड कंपनीचे बूट आरोग्यीता चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने वाटप करण्यात आले. अत्यंत माफक शैक्षणिक फी मध्ये शिक्षण देणाऱ्या सदाशिवगड येथील माध्यमिक विद्यामंदिर या शाळेत पाचुंद, मेरवेवाडी, वाघेरी, कणसेमळा, चिंचमळा अशा भागात राहणाऱ्या गरीब विध्यार्थ्यांना अनवानी शाळेत यावे लागत होते. याबद्दल संस्थेचे शिक्षक राजू अपिने सर यांचेकडून माहिती मिळताच 25 जानेवारी रोजी त्या विध्यार्थ्यांना बूट वाटप केले.                यावेळी उद्योजक सलीम मुजावर, गंगा आयुर्वेदचे अरविंद चव्हाण, ऍड.बी. बी. बनसोडे यांच्या हस्ते शूज वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक, गजानन देशमाने, शिक्षक राजगोंडा अपिने सर तसेच सर्व शाळेचे शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद गाडे यांनी आम्ही मदतीचा चिमणी सारखा वाटा उचल...

तळमावले काॅलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचा समारोप

Image
तळमावले/वार्ताहर               तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचा समारोप मौजे तारुख या ठिकाणी झाला. याप्रसंगी प्राचार्य आर.के.भोसले (माजी सहसचिव प्रशासन, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी काॅलेजचे प्राचार्य डॉ.अरूण गाडे तर सचिन कुराडे (लोकनियुक्त सरपंच तारूख), सुनील पाटील (उपसरपंच, तारूख), विक्रमराज पाटील (उपाध्यक्ष, तंटामुक्ती समिती तारुख), नितीन कुराडे (अध्यक्ष, ज्योतिर्लिंग विकास मंडळ तारुख), सचिन कुराडे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती जि.प.शाळा), लक्ष्मण लोकरे, सुरज सागरे यांची प्रमुख उपस्थिती होती.                कु.अंकिता पवार, कु.सुस्मीता वरेकर, चि.संदेश पवार (स्वयंसेवक), राजेंद्र जाधव (ग्रामपंचायत सदस्य तारुख) व सचिन कुराडे (सरपंच तारूख) यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सिनियर व ज्यु.रा.से.यो प्रकल्प अधिकारी, सदस्य, कर्मचारी या सर्वांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शा...

पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले छोटया ‘स्पंदन’चे कौतुक

Image
तळमावले/वार्ताहर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई आणि वैष्णवीराजे निंबाळकर यांचा शाही विवाहसोहळा अत्यंत दिमाखदार आणि नेत्रदीपक पध्दतीने पार पाडला. या सोहळयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस व अन्य मंत्रीमहोदय यांच्यासह पाटण मतदारसंघातील जनता मोठया संख्येने उपस्थित होती. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या लग्नसोहळयात कुटूंबप्रमुखाची जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पाडल्याचे दिसून आले. लग्नाला आलेले पाहुणे, नातेवाईक आणि मित्र परिवार यांच्या स्वागताची, जेवणाची, सोय व्यवस्थित आहे का याची ते आपुलकीने विचारपूस करत होते. मतदारसंघातील लग्नाला निमंत्रित केलेली जनता, कार्यकर्ते यांच्या पंगतीत फिरुन ना.शंभूराज देसाई हे जेवणाची व्यवस्था विचारत होते. यावेळी ‘‘साहेब, यशराजदादांच्या पत्रिका स्पंदन डाकवेने त्याच्या डाकेवाडी मध्ये वाटल्या आहेत.’’ असे सांगताच त्यांनी स्पंदन डाकवेला जवळ बोलावून घेतले. त्याच्या डोक्यावर आणि गालावर हात फिरवत ‘‘अरे वा...! छानच..! ये फोटो काढ..!’’ असे म्हणत छोटया स्पंदनचे कौतुक केले. लगीनघाईच्या या गोंधळात पालकमंत्र...

रेठरे बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमाता प्रतिष्ठान तर्फे भारतमातेच्या प्रतिमेचे हस्ते पूजन

Image
कराड/प्रतिनिधी                      रेठरे बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतमाता प्रतिष्ठान तर्फे भारतमातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच हणमंतराव सुर्यवंशी, डे.सरपंच सौ.भाग्यश्री पवार, ज्येष्ठ नागरिक श्री.जयवंतराव साळुंखे नाना, श्री.धर्मे तात्या, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ डोईफोडे, सचिन जाधव, सौ.शर्मिला मोहिते, रुकसाना मुल्ला, संंगिता सावंत, सविता पाटील, कोष्टी मॅडम, हणमंतराव धर्मे, कृष्णत कापूरकर, सुहास कापूरकर, भास्कर साळुंखे, संतोष मोहिते, रामभाऊ पवार, शिवाजी सावंत, सुुरज वेळापुुरे, संतोष कोष्टी, संजय लोकरे, मनोज पवेकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते .           पै.उत्तमराव धर्मे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व हणमंतराव गायकवाड यांनी आभार मानले.

प्रारंभ युवापर्व सामाजिक संस्था ठाणे संस्थेच्या वतीने फुटपाथ वरील गरजूना ब्लॅंकेट वाटप

Image
मुंबई/प्रतिनिधी                संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी 26 जानेवारीच्या दिवशी  ठाणे,मुंबई, नवी मुंबई परिसरातील स्टेशन तसेच फूटपाथवर कडाक्याची थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या गरजू गरीब लोकांना ब्लॅंकेट, लहान मुलांचे स्वेटर वाटप केले जाते.सालाबादप्रमाणे यावर्षीही   भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2024 रोजी वाटप करण्यात आले.                ह्या ड्राईव्ह मधून आम्ही 60 ते 70 गरीब गरजू लोकांना ब्लॅंकेट वाटप केले.त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपण सर्वांनी जी सामाजिक बांधिलकी जपून जी मदत केली त्याचे समाधान लाभले. संस्थेचे हे ब्लॅंकेट वाटपाचे 5 वे आहे.या उपक्रमांस संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आंनद कदम, खजिनदार विजय कदम, गणेश कदम, आबास कदम आणि प्रताप कदम  आदी पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी होण्यासाठी 8692814790 या क्रमांकावर संपर्क साधावा.

श्रमाला महत्त्व संस्कारामुळे येते व राष्ट्र निर्मितीमध्ये रा.से.योजनेचा मोलाचा वाटा - एस के कुंभार

Image
तळमावले/वार्ताहर                     तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीराचा उद्घाटन समारंभ मौजे तारुख ता कराड जि.सातारा या ठिकाणी संपन्न झाला.या कार्यक्रमाची सुरूवात संस्था प्रार्थनेने झाली.सर्व पाहुणे व मान्यवर मंडळींचे स्वागत व सत्कार शाल, श्रीफळ व कॉलेज झेप अंक देऊन करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री एस के कुंभार (माजी सहसचिव (अर्थ) व विद्यमान सदस्य व्यवस्थापन मंडळ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ,कोल्हापूर), अध्यक्ष - प्राचार्य डॉ अरूण गाडे (के.सी.कॉलेज,तळमावले ता पाटण ), श्री सचिन कुराडे (लोकनियुक्त सरपंच मौजे - तारुख ग्रामपंचायत), श्री प्रदिप पाटील ( माजी सभापती, कराड पंचायत समिती ), माजी प्राचार्य के.एम.पवार सर (कुसुर), युवराज कुराडे (संचालक, विकास सेवा सोसायटी), श्री राजेंद्र जाधव (सदस्य, ग्रामपंचायत तारूख), श्री सतिश भिसे- पाटील (पोलीस पाटील), भगवानराव पवार (ग्रामसेवक), श्री सचिन लक्ष्मण कुराडे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन जि.प.) यांनीही आपली...

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या घराचे दिमाखदार नूतनीकरण

Image
साताऱ्याच्या शाहूपुरी शाखेचा पुढाकार : २९ जानेवारीला डॉ.अरुणा ढेरे यांच्या हस्ते लोकार्पण सातारा/प्रतिनिधी                केशवसुत यांच्या नंतरच्या मराठी कवितेत क्रांतिकारी बदल घडविणारे युगप्रवर्तक कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या मोड़कळीस आलेल्या घराचे संपूर्ण नूतनीकरण करून त्याचे स्मारकात रुपांतर करण्याचे काम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने पूर्ण केले आहे. शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनीच नूतनीकरण आणि स्मारकाची संकल्पना मांडून पूर्ण केली आहे.बा. सी. मर्ढेकर यांच्या घराचा आणि कार्याचा ठेवा जपण्यासाठी शाहूपुरी शाखेने केलेल्या या कार्याचा महाराष्ट्र साहित्य परिषदेला अभिमान वाटतो. नूतनीकरण केलेल्या घराचे आणि स्मारकाचे लोकार्पण सोमवार, दि. २९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता एका सोहळ्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.                   प्रा. जोशी यांनी पुढे सांगितले की, बा. सी. मर्ढेकर यांचे मूळ गाव मर्ढे...

काकासाहेब चव्हाण कॉलेजला राष्ट्रीय स्तरावरील नॅक पिअर टीम भेट देणार

Image
                दि. १३ जाने २०२४ थोर देशभक्त स्वातंत्र्यसेनानी काकासाहेब चव्हाण व शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्यागातून, प्रेरणेतून १९६९ साली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर या शिक्षण संस्थेच्या काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले या महाविद्यालयाची स्थापना झाली. या ज्ञानवृक्षाने १९६९ सालापासून असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या  स्वप्नरुपी पंखांना बळ देण्याचे काम निष्ठापूर्वक केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील 'नॅक' पीअर टीमकडून (त्रिसदस्यीय समिती)  महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन  अध्ययन, अध्यापन, संशोधन, पायाभूत सुविधा आणि एकूणच शैक्षणिक गुणवत्ता इ.बाबींची तपासणी होणार आहे. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांचे संशोधन कार्य,  विविध संस्थांबरोबर केलेले सामंजस्य करार, प्राध्यापकांना व महाविद्यालयास मिळालेले विविध पुरस्कार, विविध समाज उपयोगी उपक्रम, विद्यार्थी कल्याण मंडळाचे उपक्रम, महाविद्यालयाचा प्लेसमेंट सेल, ग्रंथालयाची प्रगती, राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य, सांस्कृतिक ...

थॅंक्यू...अरुणा

Image
               शाळा काॅलेजमध्ये अपघाताने होणारी ओळख पुढील आयुष्यातही कायम राहतेच असे नाही. परंतू माझ्या बाबतीत घडलेली एक घटना मात्र त्याला अपवाद आहे. अर्थात ही ओळख टिकवण्यात त्या समोरच्या व्यक्तीचा मोलाचा वाटा आहे. काॅलेजला असताना मी जीएस च्या निवडणूकीला उभा राहिलो होतो. या निवडणूकीत मतदार असलेल्या सर्व मतदारांकडे मी गेलो होतो. त्यात प्रामुख्याने मुलीच होत्या. या सर्व मुलींशी मी मतदानासाठी बोललो होतो. मात्र त्यातील एकच मुलगी मला ठामपणे मतदान करणार होती तिने तसे सांगितले देखील होते. त्या मुलीचे नाव होते अरुणा मोरे....आताचे शेवाळे...                निवडणूक झाल्यानंतर कधीही या मतदार मुलींचा संपर्क आला नाही. अरुणाने मात्र मला मतदान केले होते. आणि ते लक्षात ठेवले होते. मीही तिला लक्षात ठेवले होते. काळाच्या ओघात प्रत्येकाच्या शिक्षणाच्या आणि जगण्याच्या वाटा बदलल्या. एकेदिवशी मी मुंबईला जात असताना कोल्हापूर नाक्यावर असताना फेसबुक वरील मेसेंजरमधून मला अरुणाचा मेसेज आला. यावेळी एकमेकांचे संपर्क क्रमांक घेतल...

तात्यांची स्पंदने ई-बुक वाचण्यासाठी क्लिक करा

Image
 ‘तात्यांची स्पंदने’ ई-बुक चे 9 जानेवारीला प्रकाशन तळमावले/वार्ताहर                पुस्तकाच्या अभिप्रायाचे ई-बुक असलेल्या ‘तात्यांची स्पंदने’ या ई-बुक चे प्रकाशन मंगळवार दि.9 जानेवारी, 2024 रोजी होणार आहे. अभिप्रायाचे ई-बुक हा साहित्य क्षेत्रातील वेगळा उपक्रम आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधत ‘तात्या’ हे पुस्तक लिहून वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे आलेल्या अभिप्रायाचे ई-बुक लेखक डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे.                      आलेल्या प्रतिक्रियांची सुंदर मांडणी ‘तात्यांची स्पंदने’ या ई-बुक मध्ये केली असून त्यांचे पुर्ण नाव, पत्ता आणि फोटोही छापण्यात आले आहेत. 11 शुभसंदेश आणि 23 प्रतिक्रियांनी नटलेले 60 पानांचे हे ई-बुक प्रत्येकाने वाचायलाच हवे. या ई-बुकचे आकर्षक मुखपृष्ठ आणि आतील रंगीत पानांची मांडणी सुप्रसिध्द कॅलिग्राफर बाळासाहेब कचरे यांनी केली आहे. डाॅ...

पत्रकार दिनानिमित्त शिवसमर्थ च्या वतीने पत्रकारांचा सन्मान

Image
तळमावले/वार्ताहर दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दि शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटी व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने संस्थेच्या तळमावले येथील मुख्य कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, देवबा वायचळ सर, रविंद्र माने, विद्या माने व संस्थेचे अन्य अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी शिवसमर्थच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि स्व.मिनाताई ठाकरे यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि स्व.मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांना हार घालून, पुजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रविंद्र माने, संदीप डाकवे व इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.  तसेच पत्रकार दिनानिमित्त रविंद्र माने, बाळासाहेब रोडे, पोपट झेंडे, विजय सुतार, संदीप डाकवे यांचा शाल, श्रीफळ व बुके देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप डाकवे यांनी तर आभार प्रदर्शन पुजा देशमुख यांनी केले.