मल्हारपेठच्या पिता-पुत्रांचे काव्यवाचन आणि वक्तृत्व स्पर्धेत यश
कराड/प्रतिनिधी
नांदगाव च्या द्वारकाबाई सुकरे प्रतिष्ठान तर्फे झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धेत मल्हारपेठ च्या प्रतीक पवार व दादासाहेब पवार यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले.
वक्तृत्व स्पर्धेत प्रतीक पवार याने "जागर स्त्री शिक्षणाचा" विषय मांडला व आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. दादासाहेब पवार यांनी खुल्या गटात "संगणक काळाची गरज" विषय प्राप्त केला. तसेच काव्य विभागात प्रतीक ने स्वच्छतेचा ध्यास ही कविता उत्कृष्ट रित्या सादर केली. दादासाहेब पवार यांनी "बाबा माग नाय हटायचं" ही कविता उत्कृष्ट रित्या सादर केली - दोघांनीही वक्तृव व काव्य क्षेत्रात उज्ज्वल यश प्राप्त केले आहे.
पारितोषिक वितरण समारंभ कोटा अकॅडमी कराड च्या संस्थापिका सौं मंजिरी खुस्पे, प्राचार्या सौं.जयश्री पवार प्रमिलाताई पॉलीटेकनिक कराड चे विजय तोडकर यांच्या हस्ते व दक्षिण मांड व्हॅली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वि.तू . सुकरे, सचिव एस.सुकरे, संजय घाटे, निरंजन घाटे, अजित घाटे, प्रा गौरव तसेच न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य शिक्षक सेवक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या यशाबद्दल विविध स्तरांतून पिता-पुत्राचे अभिनंदन होत आहे.


Comments
Post a Comment