श्रमाला महत्त्व संस्कारामुळे येते व राष्ट्र निर्मितीमध्ये रा.से.योजनेचा मोलाचा वाटा - एस के कुंभार
तळमावले/वार्ताहर
तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीराचा उद्घाटन समारंभ मौजे तारुख ता कराड जि.सातारा या ठिकाणी संपन्न झाला.या कार्यक्रमाची सुरूवात संस्था प्रार्थनेने झाली.सर्व पाहुणे व मान्यवर मंडळींचे स्वागत व सत्कार शाल, श्रीफळ व कॉलेज झेप अंक देऊन करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री एस के कुंभार (माजी सहसचिव (अर्थ) व विद्यमान सदस्य व्यवस्थापन मंडळ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ,कोल्हापूर), अध्यक्ष - प्राचार्य डॉ अरूण गाडे (के.सी.कॉलेज,तळमावले ता पाटण ), श्री सचिन कुराडे (लोकनियुक्त सरपंच मौजे - तारुख ग्रामपंचायत), श्री प्रदिप पाटील ( माजी सभापती, कराड पंचायत समिती ), माजी प्राचार्य के.एम.पवार सर (कुसुर), युवराज कुराडे (संचालक, विकास सेवा सोसायटी), श्री राजेंद्र जाधव (सदस्य, ग्रामपंचायत तारूख), श्री सतिश भिसे- पाटील (पोलीस पाटील), भगवानराव पवार (ग्रामसेवक), श्री सचिन लक्ष्मण कुराडे (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन जि.प.) यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
मा एस के कुंभार सर आपल्या मनोगता म्हणाले, रा.से.यो.विभाग हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्म शताब्दी महोत्सव म्हणजे १९६९ साला पासून सुरुवात झाली.गांधीजींनी आपल्या जीवनात श्रमाला फार महत्त्व देण्यात आले आणि श्रमाबरोबर संस्काराची गरज आहे त्यांनी सांगितले तसेच गांधीजीनी "3H" ची ,(Heart, Head & Hand) संकल्पना मांडली मन, मेंदु आणि मनगट यांचा विकास होऊन व्यक्तीमत्वाचा देखील विकास होण्यास मदत होते.राष्ट्रनिर्मिती मध्ये रा.से.यो विभागाचा मोलाचा वाटा आहे .या विशेष श्रमसंस्कारा बरोबर प्रबोधनात्मक
कार्यक्रमाचा फायदा गावकर्यांनी घेऊन गावच्या विकासासाठी स्वयंसेवकांच्या बरोबरांनी कामे करून त्यांना हातभार लावून गावच्या विकासात मदत होईल.रा.से.यो विभागातुन नवनिर्माण व नवनिर्मिती कौशल्य प्राप्त करून भारत बलशाली होण्यास मदत होईल.असे उद्यघाटन प्रसंगी मा.एस.के.कुंभार सरांनी मनोगत व्यक्त केले.तसेच अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ अरूण गाडे सर म्हणाले कि, सलग सात दिवस माझ्या महाविद्यालयातील रा.से.यो.विभागातील स्वयंसेवकांनी शिस्तीचे पालन करुन गावातील लोकांच्या स्नेह जपत गावच्या सर्वांगिण विकासास मदत करून इथुन संस्काराचे बीज घेऊन आपल्या भावी आयुष्यात या श्रमसंस्कारांचा विसर पडता कामा नये तसेच आपले आयुष्य अधिक समृध्द करण्यासाठी रा.से.योजनेची गरज आहे असे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले. यापैकी काही मान्यवर मंडळींनी मनोगते पुढील प्रमाणे मा सचिन कुराडे (सरपंच), मा प्रदिप पाटील (माजी सभापती कराड पं.स.) यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा महेश चव्हाण (प्रकल्प अधिकारी, रा.से.यो.विभाग) सरांनी केले. सुत्रसंचालन प्रा सचिन पुजारी सरांनी केले, आभार मा श्री राजेंद्र जाधव (सदस्य, ग्रामपंचायत तारूख), केले. कार्यक्रमास रा.से.यो.विभागातील प्रकल्प अधिकारी व सदस्य स्वयंसेवक व स्वयंसेवीका, गुरूदेव कार्यकर्ते, आजी - माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ,महिला उपस्थित होते.

Comments
Post a Comment