ग्रामपंचायतीने पवनचक्क्यांना क्रमांक देऊन त्यांचे जिओ टॅगिंग करावे - - ना.शंभूराज देसाई

पाटण/प्रतिनिधी 

             पाटण तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये पवनचक्की उभ्या आहेत, त्या संबंधित कंपन्यांकडून ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या कराबाबतची आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. पाटण तालुक्यात १,०६२ पवनचक्क्यांची नोंद असून उभारण्यात येणाऱ्या प्रत्येक पवनचक्कीची नोंद कटाक्षाने झालीच पाहिजे, याबाबत यंत्रणांनी दक्षता घ्यावी. ग्रामपंचायतीने पवनचक्क्यांना क्रमांक देऊन त्यांचे जिओ टॅगिंग करावे, असे निर्देश यावेळी दिले. तसेच पवनचक्की कंपन्यांनी करचुकवेगिरी करू नये, यासाठी संबंधित पवनचक्क्यांमधून किती विद्युतनिर्मिती होते याची तपासणी करण्यात यावी. कर थकबाकी असणाऱ्या कंपन्यांना अंतिम नोटीस देऊन विहीत मुदतीत भरणा न झाल्यास कारवाई करावी व थकबाकीदारांकडून व्याजासह वसुली करण्यात यावी, अशाही सूचना यावेळी दिल्या.

            यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, पाटणचे प्रांत सुनील गाडे, महाऊर्जाचे महाव्यवस्थापक श्री. शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमोळे हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

अक्षरप्रेमींचा गौरव..! राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न