तात्यांची स्पंदने ई-बुक वाचण्यासाठी क्लिक करा
‘तात्यांची स्पंदने’ ई-बुक चे 9 जानेवारीला प्रकाशन
तळमावले/वार्ताहर
पुस्तकाच्या अभिप्रायाचे ई-बुक असलेल्या ‘तात्यांची स्पंदने’ या ई-बुक चे प्रकाशन मंगळवार दि.9 जानेवारी, 2024 रोजी होणार आहे. अभिप्रायाचे ई-बुक हा साहित्य क्षेत्रातील वेगळा उपक्रम आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधत ‘तात्या’ हे पुस्तक लिहून वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे आलेल्या अभिप्रायाचे ई-बुक लेखक डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे.
आलेल्या प्रतिक्रियांची सुंदर मांडणी ‘तात्यांची स्पंदने’ या ई-बुक मध्ये केली असून त्यांचे पुर्ण नाव, पत्ता आणि फोटोही छापण्यात आले आहेत. 11 शुभसंदेश आणि 23 प्रतिक्रियांनी नटलेले 60 पानांचे हे ई-बुक प्रत्येकाने वाचायलाच हवे. या ई-बुकचे आकर्षक मुखपृष्ठ आणि आतील रंगीत पानांची मांडणी सुप्रसिध्द कॅलिग्राफर बाळासाहेब कचरे यांनी केली आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘तात्या’ पुस्तकाच्या अभिप्रायाचे ‘तात्यांची स्पंदने’ हे ई-बुक तयार करुन साहित्य क्षेत्रात अभिनव संकल्पना सुरु केली असून त्याचे साहित्यिकांकडून कौतुक होत आहे.
https://heyzine.com/flip-book/e0d5a1dd07.html
ई-बुक वाचण्यासाठी वरील लिंक क्लिक करा. शिवाय आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा.

Comments
Post a Comment