काळगाव विद्यालयाची क्षेत्रभेट
तळमावले/वार्ताहर
न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज काळगाव विद्यालयाची क्षेत्रभेट मंगळवार दि.12/12/ 2023 रोजी आयोजित करण्यात आली.विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. कांबळे ए.पी.सर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रभेटीचे नियोजन करण्यात आले होते. इ.5 वी ते 12 वी अखेर 130 विद्यार्थी व 10 शिक्षक सहभागी होते. क्षेत्रभेटीसाठी निसर्ग पर्यटन केंद्र भोसगाव, साई गुळ प्रक्रिया केंद्र चचेगाव व सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड ही ठिकाणी निवडण्यात आली होती. तसेच 51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी वाल्मिक विद्यामंदिर तळमावले या ठिकाणी ही भेट देण्यात आली.
सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड या ठिकाणी सुरू असलेल्या व्यावसायिक कोर्सेसची माहिती घेण्यात आली. त्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट,लेडीज पार्लर,फॅशन डिझाइनिंग, जेन्टस पार्लर, बँकिंग अशा विविध कोर्सेस ची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री.राजमाने सर उपप्राचार्य मा.श्री. एस. ए. पाटील सर तसेच श्री. आर.वाय.पाटील सर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.




Comments
Post a Comment