विज्ञान प्रदर्शन हे शालेय वयातच संशोधनाची प्रेरणा देतात : श्रीराम साळुंखे


तळमावले/वार्ताहर

            जिज्ञासा,चिकित्सक वृत्ती व सृजनशीलतेला शालेय वयातच  शालेय स्तरावर हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि विद्यार्थ्यांनी घटनेच्या मुळापर्यंत जाऊन कारणांचा शोध घ्यावा व कार्यकारणभाव शोधून काढावा आणि एवढ्यावरच न थांबता समाजाच्या भल्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून  'समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ' कसे उपयुक्त आहे हे बालकांना बालवयातच कळाव यासाठी अशा प्रदर्शनांचे आयोजन गरजेचं आहे असे प्रतिपादन श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विद्या समिती अध्यक्ष श्रीराम साळुंखे यांनी ५१ व्या पाटण तालुका विज्ञान प्रदर्शन पारितोषिक वितरण व समारोप प्रसंगी केले. 

            साऱ्या ब्रम्हांडात विज्ञानाचे अस्तित्व असून त्याची जाणीव विद्यार्थ्यांना शालेय वयातच होत असून त्यांना विचारप्रवर्तक करत आहे हे अशा प्रदर्शनाचे यश म्हंटले पाहिजे.ग्रामीण भागातील विद्यार्थांसाठी प्रदर्शन पर्वणी ठरले आणि याच्या आयोजनाच्या मिळालेल्या संधीचे सोने गुरुदेव कार्यकर्त्यांनी करून वाल्मिकी विद्यालयाचा नावलौकिक वाढविला याचा सार्थ अभिमान आहे असे उदगार काढले.

सदर कार्यक्रमास तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर,विस्तार अधिकारी निकम व भिसे मुख्याध्यापक श्री.सावंत व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

           यामध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपकरणांचे उपयुक्तता मूल्य विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या उपकरणांचे गटनिहाय गुणानुक्रम खालीलप्रमाणे असून त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

लहान गटात  समर्थ विद्यालय चाफळच्या रामदास दिपक मोरे याच्या भूस्खलन संरक्षण अलार्म उपकरणाचा प्रथम , जि प शाळा कोंजवडेच्या करण सोनावले व आयुष मोरे यांच्या ड्रायवर अलर्ट सिस्टम  उपकरणाचा द्वितीय तर क्षेत्रपाल विद्यालयाच्या समर्थ सुतारच्या मेकॅनिकल डायनामो चा तृतीय व वाल्मिकी तळमावळेच्या शर्वरी लोहरचा उत्तेजनार्थ क्रमांक आला . मोठ्या गटात तारळेच्या अनुष्का व परिधी क्षीरसागर यांच्या many uses of waste part of banana tree उपकरणाचा प्रथम ,शुभम घोलप व सर्वेश देशपांडे यांच्या सुपारी सोलणी यंत्राचा द्वितीय तर वाल्मिकी तळमावल्याच्या आर्यन शेवाळे ,आदित्य शिंदे यांच्या Clap Switch व सिद्धेश्वर काढणेच्या प्राची उबरंके व गायत्री घोरपडे यांच्या टोकणी व खत पेरणी उपकरणाचा तृतीय क्रमांक तर शिक्षक गटात लक्ष्मण माने प्राथमिक प्रथम,नितीनकुमार कांबळे माध्यमिक प्रथम,अनिल कोळी प्रयोगशाळा प्रथम क्रमांक मिळविला. तर  प्रदर्शना निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत  लहान गटात रुद्रिका सदरे प्रथम , आर्या भागवत द्वितीय,श्रावणी सरगडे तृतीय तर मोठ्या गटात प्रांजल माने प्रथम,रोहीत किर्वे द्वितीय,जोया मुकादम तृतीय तर निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात प्राची शेळके प्रथम,आकांक्षा नांगरे द्वितीय, राजनंदिनी पवार तृतीय माध्यामिक गटात  सानवी कांबळे प्रथम,पायल जाधव द्वितीय, स्नेहा सावंत तृतीय ,प्रांजल सत्रे उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आनंदराव सावंत यांनी तर स्वागत व सूत्रसंचालन श्री. परशराम जंगाणी यांनी व आभार श्री.सूर्यवंशी यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न