श्री वाल्मिकी विद्यामंदीरात ५१ व्या पाटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

तळमावले/वार्ताहर

            विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला वाव मिळावा त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या विविध घटनांमधील विज्ञान समजावे यादृष्टीने सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांचेवतीने दरवर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.

           सन २०२३-२४ चे पाटण तालुक्याचे तीन दिवशीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजनाचा मान श्री.वाल्मिकी विद्यामंदिर तळमावळे यांना मिळाला असून ते दि ११ ते १३ डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे.

          या प्रदर्शनात तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थी , शिक्षक, प्रयोगशाळा परिचर यांना सहभाग घेता येणार असून कृषी,पर्यावरणपूरक  जीवनशैली,संगणकीय विचार,आरोग्य या विषयावर उपकरणांचा सहभाग राहणार आहे.त्याचबरोबर लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

           सदर तीन दिवशीय प्रदर्शन हे पाहण्यास सर्वांसाठी खुले असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी श्रीमती बोरकर व मुख्याध्यापक श्री.सावंत यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न