अनाथ बालकांना सुखाचा घास देऊन साईशा कोळेकर चा वाढदिवस साजरा


तळमावले/वार्ताहर

            आधार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ महादेव कोळेकर यांच्या साईशा या मुलीचा पहिला वाढदिवस दिघा नवी मुंबई येथील प्रिसकिल्ला चिल्ड्रन्स होम (फ्रेण्डशिप सेंटर) या अनाथ आश्रम मधील मुलांना जेवण देत साजरा केला. याप्रसंगी आधार फाऊंडेशन चे पदाधिकारी व मित्रपरिवार उपस्थित होते.

             "मोठंमोठे केक कापून वाढदिवसाचे प्रदर्शन करण्यापेक्षा प्रत्येकाने जन्मदिनी या अनाथ बालकांना सुखाचा घास दिल्यास ईश्वराचे  आशिर्वाद मिळतील. आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून अनाथ मुलांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे व आपले कर्तव्य आहे. या समाजासाठी काहीतरी करणं व आपल्या आनंदात अनाथ मुलांना सामावुन घेणं व त्यांची मदत रुपी सेवा करुन त्याचं दुःख कमी करणं म्हणुन अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत आहोत. आजपर्यंत आधार फाऊंडेशन च्या माध्यमातून अनाथ आश्रम, वृध्द आश्रम खेडेगावातील शाळा व विधवा आधार नसलेल्या महिलांसाठी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत" अशी भावना याप्रसंगी रामभाऊ महादेव कोळेकर यांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान