वाडयाची पंचाहत्तरी साजरी करणारे मोरे घराणे.

 

तळमावले /वार्ताहर

                    आपण राहतो त्या वास्तुप्रती जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी पाटण तालुक्यातील मोरेवाडी (कुठरे) येथील मोरे घराण्याने मोरे वाडयाची पंचाहत्तरी साजरी करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. पाटण तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेला या कुटुंबाचा मोऱ्यांचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. या कुटुंबातील मूळ पुरुष कै.ज्ञानू संतू मोरे, गेले कित्येक वर्ष झाले हे कुटुंब या मूळ पुरुषाचा पुण्यतिथी सोहळा साजरा करत आले आहे. यावर्षी या पुण्यतिथीला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पुण्यतिथीची कीर्तन सेवा गेले कित्येक वर्ष झाले श्री सद्गुरूरावसाहेब महाराज चिखलीकर यांनी केली व यांच्या परंपरेतील कीर्तनकार ही सेवा करत आले आहेत. या पुण्यतिथीची पहिली कीर्तन सेवा श्री सद्गुरू.रावसाहेब महाराज चिखलीकर यांनी बरेच वर्ष सेवा केली त्यांच्या नंतर श्री. सद्गुरू उत्तम महाराज चिखलीकर हे करत आले आणि त्यांच्या नंतर श्री गुरुदेव अच्युत महाराज चिखलीकर हे करत आहेत. आज या परंपरेतील किर्तन सेवेला पण 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. अतिशय आनंदीमय वातावरणामध्ये या मोरे कुटुंबातील मूळ पुरुष कै.ज्ञानू संतू मोरे यांचा 50 वा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने आबांच्या प्रतिमेची मोेरेवाडी गावातून टाळ मृदूगांच्या गजरात पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी मोरे परिवारातील सर्वजण उपस्थित होते.


                        आबा म्हणजे एक दूरदृष्टी व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती, त्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याची आवड होती. त्यांना पंचांग खूप चांगल्या प्रकारे समजत होतं. त्यांना दोन बहिणी, सात मुले व तीन मुली असा त्यांचा परिवार आहे. त्यांनी सर्व मुलांना चांगले संस्कार देऊन वाढवलं. प्रत्येक मूल ही त्यांची विलक्षण ताकद होती. त्यांच्या पश्चात आज परिवार त्यांनी बांधलेल्या वाड्यामध्ये सुखाने राहत आहे.
                    आबा म्हणजेच आमची सुरुवात व आबा म्हणजेच आमचा शेवट असे मोरे कुटूंबीय मानतात. आबांची ५० वी पुण्यतिथी व आबांनी बांधलेल्या वाड्याला ७५ वर्ष पूर्ण झाली हे औचित्य साधून गुरुवार दि.९ नोव्हेंबर व शुक्रवार १० नोहेंबर, 2023 ला कीर्तन व दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.
                        आज मोरे वाड्यात जवळपास 140 लोक आहेत व त्यांचा गोतावळा मिळून जवळपास 350 लोक आहेत आणि हा सर्व गोतावळा एकत्र यावा म्हणून शुक्रवार दि.17 आणि शनिवार दि.18 नोव्हेंबर, 2023 ला पारिवारिक स्नेह संमेलन मु. मोरेवाडी ता. पाटण जि. सातारा या ठिकाणी आबांच्या वाड्यात आयोजित केले आहे. आणि या कार्यक्रमाला आबांची दुसरी पिढी ते पाचवी पिढी असे सर्वजण एकत्र येणार आहेत ही मोरे कुटुंबासाठी एक ऐतहासिक बाब आहे.
वाडयाचे काम त्यावेळी ज्या कारागिरांनी केले आहे. त्यांची नावे देखील आबांनी लिहून ठेवली असून त्यांची आठवण म्हणून त्यांच्या वारसांचा पोषाख देवून सत्कार करण्यात आला आहे.

                      कै. ज्ञानू संत मोरे (आबा) यांची ५० वी सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी व मोरे वाड्याचा ७५ वा अमृत महोत्सवी वर्ष साजरा होत आहे. या अनुषंगाने पुढीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित केले आहेत. शुक्रवार दि.17 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन नंतर महिलांसाठी पारंपरिक कार्यक्रम, महिलांसाठी माझे कुटुंब व माझा वाडा या विषयावर मनोगत व्यक्त करणे, लहान मुलांनाचे पारंपरिक नृत्य चा कार्यक्रम, महिलांसाठी संगीत खुर्ची, संध्याकाळी ८.३० वाजता भोजनाचा कार्यक्रम असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर शनिवार दि.18 नोव्हेंबर, 2023 रोजी कौटुंबिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. यामध्ये आबांची लेक गुणाआत्ती, सूना जिजी, इंदुताई व मीनाताई तर सौ.माया हणमंत मोरे (काकी) यांचा राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सन्मान होईल. तसेच सौ. गौरी युवराज पाटील व सौ.शुभांगी कुलदीप जगदाळे व इतर यांचाही सन्मान होईल. वाडयाची माहिती देणारी एक डॉक्युमेंट्री सादर होणार आहे. अशा या सर्वांगसुंदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मोरे परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.





Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न