कालेचे विकास पाटील यशवंतराव चव्हाण शैक्षणिक सेवा पुरस्काराने सन्मानित


काले/वार्ताहर

            महात्मा गांधी विद्यालय कालेचे स्कूल कमिटी सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विकास पाटील हे शाळेची इमारत उभारण्यासाठी करत असलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना यशवंतराव चव्हाण शैक्षणिक सेवा पुरस्काराने सिक्कीम चे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील, माहिती तंत्रज्ञान विभाग राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, श्रीनिवास पाटील फाऊंडेशन च्या उपाध्यक्षा रचनाताई पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, यशवंत नगरी न्युज चॅनेल चे संपादक विकास भोसले, कार्यकारी संपादक स्वाती भोसले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

             विकास पाटील यांनी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या विचारांचा पाईक म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या जन्मभूमीत व कर्मवीरांच्या कर्मभूमीत गेल्या 11 वर्षापासून गावा मध्ये शैक्षणिक चळवळ उभी केली आणि शाळा माऊलीच्या नूतन इमारतीच्या जागेपणी पाहिलेल्या स्वप्नाला खऱ्या अर्थाने 2018 ला यश यायला सुरुवात झाली.

           गेल्या पाच वर्षापासून रात्रीचा दिवस करून न थांबता, न थकता अविरतपणे विकास पाटील काम करत राहिले आहेत. याकाळात त्यांना अनेकांनी मागे खेचण्याचा प्रयत्न केला. काम करत असताना कोण काय म्हणत असेल म्हणून त्यांनी बहिरेपणाचे सोंग केले. फक्त शाळा माऊलीच्या नाविन्यपूर्णतेसाठी, आधुनिकीकरणासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी वेल्फेअर फंडामार्फत 1कोटी, रयत शिक्षण संस्था सातारा 55 लाख, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड 20 लाख, महात्मा गांधी विद्यालय काले चे आजी-माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक, रयत शिक्षण संस्थेवर, कर्मवीरांवर प्रेम असणाऱ्या असंख्य ज्ञात-अज्ञात दानशूर व्यक्तिमत्त्वानी व काले तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पाठीशी उभे राहून आजअखेर 61 लाख 50 हजार रुपये असा एकूण 2 कोटी 36 लाख 50 हजार रुपये निधी, देणगी देऊन शाळा माऊलीच्या स्वप्नपूर्तीला हातभार लावला आहे. 

          विकास पाटील करीत असलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन अनेक व्यक्तिमत्त्वांनी व संस्थांनी पाठीवर कौतुकाची थाप देत विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. यशवंतनगरी न्यूज चॅनेल, कराड यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा यशवंतराव चव्हाण शैक्षणिक सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.



Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न