ढेबेवाडी विभागातील यात्रेचा हंगाम सुरु, कुंभारगांवच्या लक्ष्मीदेवीची यात्रा 27 आणि 28 नोव्हेंबरला

तळमावले/वार्ताहर

                  पाटण तालुक्यातील मौजे कुंभारगांव येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी अंबाबाई देवीची यात्रा कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा सोमवार दि. 27 नोव्हेंबर, 2023 रोजी भर व मंगळवार दि.28 नोव्हेंबर, 2023 रोजी खेळणे होणार आहे. कुंभारगावच्या या यात्रेने ढेबेवाडी विभागातील यात्रेचा हंगाम सुरु होत आहे. सोमवार दि. 27 नोव्हेंबर रोजी पहाटे श्री ची काकड आरती, दरम्यान नवसाचे दंडस्थान याने सुरुवात होणार असून अन्य धार्मिक कार्यक्रम दिवसभर चालू राहतील. सायंकाळी 7 ते 10 देवीचा यात्रेचा महाप्रसाद भंडारा होणार आहे. याचवेळी मंदिराशेजारील तळ्याच्या काठावर पणत्या प्रज्वलीत केल्या जातात. रात्री 11 वाजता कुंभारगांव वाडी वस्त्यांवरील देवदेवता पालख्या, सासनकाठी यांचे ग्रामस्थ, कुंभारगांव यात्रा कमेटी कडून भव्य स्वागत करून त्यांचे मंदिराकडे प्रस्थान केले जाते. रात्री 12 वाजता वसंतराव वाडेकर कराडकर यांचा लोकनाट्या तमाशा होणार आहे.

                मंगळवार दि. 28 नोव्हेंबर, 2023 हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी सकाळी 6 ते 11 या वेळेत पालख्या, सासनकाठी यांचा छबिना भव्य मिरवणूक होणार असून सकाळी 11.30 वाजता दिवसाचा वसंतराव वाडेकर कराडकर लोकनाट्य तमाशा दुपारी 3 वाजता होईल. त्यानंतर भव्य जंगी निकाली मातीतील कुस्ती मैदान भरवण्यात येणार आहे. या कुस्ती मैदानात कुस्ती लावण्यासाठी इच्छुकांनी यात्रा समितीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.




Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न