काकासाहेब चव्हाण कॉलेज मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

तळमावले/वार्ताहर

काकासाहेब चव्हाण कॉलेज,तळमावले या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक आणि क्रिडा विभागाअंतर्गत वांग व्हँली वसतिगृहातील मुलांना महाविद्यालयातील विद्यार्थींनी स्वतः बनविलेल्या राखी तयार करून  रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने कॉलेज मधील विद्यार्थ्यींनीने या वसतिगृहातील मुलांना राखी बांधून बहिण आणि भाऊ प्रेमांचे आणि काळजीचे ,स्नेह बंधाचे प्रकटीकरण करण्यात आले. या सणाच्या निमित्ताने असे म्हटले जाते कि , " राखी एक प्रेमाचे प्रतिक आहे , राखी एक विश्वास आहे ,तुमच्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेल हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी सर्व भगिनींना देऊ इच्छितु "  या कार्यक्रमाचे नियोजन रा से यो विभागातील प्रकल्प अधिकारी व सदस्य यांनी केले यामध्ये प्रा महेश चव्हाण, प्रा संभाजी नाईक,  प्रा सी जी पुटवाड, प्रा सौ ज्योती बाऊचकर, प्रा सचिन पुजारी यांनी केले. तसेच या राखी बनविण्यासाठीचे ट्रेनिंग देण्याचे काम कॉमर्स विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.उषादेवी साळुंखे व त्यांच्या टिमने केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी प्राचार्य डॉ अरूण गाडे, सर्व गुरूदेव कार्यकर्तै व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. यावेळी प्रा.डॉ.विक्रांत सुपूगडे, ज्यु.स्टाफ सेक्रेटरी प्रा.आर.एस.जाधव, प्रा.सौ.बी.एस.सालवाडगी, प्रा.डॉ.जे.यु.मुल्ला (ग्रंथपाल ) तसेच प्रशासकीय कर्मचारी श्री राजु दोडमणी, श्री.आनंदा घुगरे तसेच वांग व्हँली वसतिगृहातील श्रीधर यादव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न