गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती टेंभू हायस्कूलमध्ये विविध उपक्रमांनी साजरी


 समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना खासदार श्रीनिवास पाटील, अशोकराव थोरात, प्रकाश पाटील आदी

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ढेबेवाडी/वार्ताहर

        समाज समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची 167 वी जयंती निमित्त टेंभू हायस्कूलने गावातून आगरकरांच्या प्रतिमेची मिरवणूक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच आगरकरांच्या विषयी विविध वेशभूषा व भाषणे अशा उपक्रमांनी साजरी केली.

        समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हायस्कूल टेंभू तालुका कराड या विद्यालयामध्ये नुकतीच आगरकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुधारक शिक्षण संस्था टेंभूचे सचिव माजी प्राचार्य प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास मळाई देवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, सुधारकचे उपाध्यक्ष सुरेश शिंदे, संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका माजी प्राचार्या सौ.उज्वला पाटील, कराड पुढारी कार्यालयाचे प्रमुख सतिश मोरे मुख्याध्यापक फैय्याज संदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

      मान्यवरांच्या हस्ते आगरकरांच्या पुतळ्याचे प्रथमतः पूजन करण्यात आले यानंतर टेंभू गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केली होती तसेच आगरकरांच्या सामाजिक कार्याविषयी घोषणा दिल्या. यानंतर झालेल्या कार्यक्रमात एन एम एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले तसेच दहावी मध्ये दोन अपंग विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्यांचा व त्यांचे लेखनिक यांना रोख रकमेचे पारितोषिक देण्यात आले. सचिव प्रकाश पाटील सर व उपाध्यक्ष सुरेश शिंदे यांच्यातर्फे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आली. याचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

      यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी आगरकर यांच्या सामाजिक कार्याविषयी व एक जागरुक पत्रकार म्हणून केलेल्या कार्याविषयी गौरव उद्गगार काढले. प्रकाश पाटील यांचे ही यावेळी भाषण झाले कार्यक्रमास गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक फैय्याज संदे यांनी स्वागत केले, नागरगोजे सर यांनी सूत्रसंचालन केले, एस.जे. शिंदे यांनी आभार मानले.



         

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न