अडूळच्या डाॅ.रोहित केंडेचा आदर्श तरुणांनी घ्यावा - यशराज देसाई
तळमावले/वार्ताहर
अडूळच्या डाॅ.रोहित केंडेचा आदर्श तरुणांनी घ्यावा. ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील मुले आपली बौद्धिक क्षमता प्राप्त करून यश संपादन करतात ही बाब खरोखरच अभिमानास्पद आहे. त्यांच्या यशाने अडूळ गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. असे गौरवोद्गार लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी काढले ते डॉ.रोहित केंडे यांच्या सत्काराप्रसंगी बोलत होते.
डाॅ.रोहित केंडे हे मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक पी.एल.केंडे यांचे चिरंजीव होत. डॉ.रोहित केंडे याने नुकतीच एम.एस.(नेत्ररोग तज्ञ)डिग्री प्राप्त केली, त्याबद्दल त्यांचा यशराज देसाई व अन्य मान्यवर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
डाॅ.रोहित यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण शिवांजली इंग्लिश मीडियम स्कूल नाडे नवारस्ता, अकरावी एसजीएम कॉलेज कराड, बारावी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे झाले. 12 विज्ञान वैद्यकीय MH CET परीक्षेत त्यांनी राज्यात 110 वा आणि कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. एमबीबीएस लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय सायन मुंबई येथे त्यांनी नीट पीजी मध्ये देशात सात हजारावा क्रमांक मिळवला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून नेत्र शल्य चिकित्सा एम एस डिग्री प्राप्त केली आहे. डाॅ.रोहित शिंदे यांना वडिलांपाप्रमाणेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची खूप आवड आहे.
डॉ.रोहित केंडे यांनी वैदयकीय क्षेत्रांतील एम.एस.डिग्री प्राप्त केल्याबद्ल मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, नामदार शंभूराज देसाई साहेब यांचे स्वीय सहाय्यक रवी साळुंखे, रवी तावरे, विवेक भिसे, सागर चव्हाण, शिवशाही सरपंच संघ पाटण तालुका अध्यक्ष विजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते व भैरवनाथ सहकारी दूध संस्थेचे संचालक धनाजी केंडे, नाडेचे माजी सरपंच विष्णू पवार, येराड हायस्कूलचे मुख्याध्यापक विजयकुमार शिर्के, सुरेश शिकेॅ, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब पाटील, शिवशंभो दूध संघाचे संचालक सर्जेराव शिर्के, भैरवनाथ सहकारी दूध डेरीचे चेअरमन कृष्णत शिर्के, माजी केंद्रप्रमुख शिवाजी शिर्के, अडूळ गावठाणचे माजी सरपंच जयवंत केंडे, हनुमान विकास सेवा सोसायटीचे संचालक अशोक केंडे गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी डॉ.रोहितचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment