रोटरी क्लब ऑफ मलकापूर चा पदग्रहण समारंभ संपन्न


मलकापूर/वार्ताहर

              1 जुलै ते 30 जून असे रोटरी वर्ष असते. यासाठी निवड झालेल्या अध्यक्ष विलासराव पवार सेक्रेटरी विनोद आमले आणि संचालक मंडळ यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या दिमाखात हॉटेल सफायर येथे पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून PDG रो. डॉ. दिपक पोफळे रा. उमरगा आणि असिस्टंट गव्हर्नर रो. राजेंद्र सावंत हे उपस्थित होते. कार्यक्रमाला मा. सेक्रेटरी रो. राजन वेळापुरे, सर्व रोटरी सदस्य सहपरिवार, पत्रकार, आणि मित्रपरिवार उपस्थित होता. 

           यावेळी डॉ. पोफळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, रोटरी एक तारामंडळ आहे आणि सर्व सदस्य आपण तारे आहोत. आणि केवळ सेवा या एका प्रेरणेने वेगवेगळ्या माध्यमातून निरपेक्ष भावनेने समाजसेवेचे हे काम जगभर करीत असतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोलिओ निर्मूलन. पोलिओ साठी सर्वांत जास्त निधी रोटरी फौंडेशन ने दिला आहे. हे फौंडेशन लोक देणगीतूनच निधी उभा करते. त्यासाठी आपण सर्वांनी दान करावे, आपण देतो त्याच्या अनेकपटीने आपल्याला ते परत मिळते याबद्दल त्यांनी काही सस्वानुभव सांगितले. आपल्या मदतीने एखाद्याच्या आयुष्यात स्थित्यंतर घडू शकते आणि ते पाहण्याचे समाधान याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. हे वर्ष परिवर्तनाचे आहे असे त्यांनी सांगताना या वर्षी नक्कीच आपण परिवर्तन घडवणार असा आत्मविश्वास सर्वाना दिला. आपण एक गाव दत्तक घेऊ आणि त्याचा चेहरामोहरा बदलून टाकूया असे त्यांनी क्लब ला सुचविले. प्रत्येक सदस्याने स्वयंप्रेरणेने काम केले पाहिजे, अध्यक्षांनी सर्वाना सामावून काम करावे आणि रोटरी क्लब मलकापूर च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

 असिस्टंट गव्हर्नर रो. राजेंद्र सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अल्पावधीत नावारूपास आलेला मलकापूर क्लब ची ह्यावर्षी जबाबदारी माझ्यावर आहे, त्यांना सर्वोतोपरी मार्गदर्शन करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. DG स्वाती हेरकळ यांनी नियोजित केलेल्या विविध प्रोजेक्ट बाबत त्यांनी थोडक्यात माहिती दिली. 

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. विजय चव्हाण आणि रो. डॉ. शितल जाधव यांनी केले. माजी अध्यक्ष रो. अरुण यादव यांनी निरोपाचे मनोगत व्यक्त केले.तर नूतन अध्यक्ष विलासराव पवार यांनी यावर्षी एकतरी ग्लोबल ग्रॅन्ट करणार असल्याची हमी दिली. परिवर्तन ग्राम, इंटरॅक्ट आणि RCC क्लब स्थापन करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी समाजातील धाडसी लोकांना शौर्य पदक देण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डिस्ट्रिक्ट पदाधिकारी रो. सलीम मुजावर, रो. भगवान मुळीक, रो. अमर जाधव, रो. अरुण यादव आणि सर्व संचालक मंडळ यांचा सत्कार करण्यात आला. मानद सदस्यपद डॉ. शिवाजीराव कोळेकर आणि डॉ. स्वाती थोरात यांना देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांची ओळख रो. संभाजी पाटील आणि रो.भगवान मुळीक यांनी करून दिली. आभार नूतन सेक्रेटरी रो. विनोद आमले यांनी मानले.  

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न