राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार डी.एस.दीक्षित यांना जाहीर
तळमावले/वार्ताहर
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा कोल्हापूरातील राजर्षी शाहुंच्या समतावादी नगरीतील नावाजलेल्या मानाच्या व सन्मानाच्या राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार कुठरे येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक दामोदर शामराव दिक्षीत यांना जाहीर झाला आहे. कोरोनाच्या काळात दिक्षीत सरांनी पिंपळपानावर चित्रे रेखाटण्याचा छंद जपला त्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड, वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड बुक मध्ये झाली होती. याशिवाय शैक्षणिक काम करताना अनेक नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले होते. बोलक्या भिंती, टाचण वही हे उपक्रम त्यांचे विशेष गाजले.
चित्रकला क्षेत्रात करत असलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केल्याचे अॅड.करुणा विमल यांनी सांगितले. राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार-2023 या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि तीन हजार रुपयांची पुस्तके असे असून या पुरस्काराचे वितरण रविवार दि. 18 जून, 2023 रोजी दुपारी 12.00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होणाऱ्या राजर्षी राष्ट्रीय बाल लघु चित्रपट महोत्सवात आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार जयंत आसगावकर, विद्रोही शाहीर संभाजी भगत, प्रा. बाबुराव गुरव, अभिजित बिचुकले, प्रा. टी. के. सरगर, विजया कांबळे, छाया पाटील, दिग्दर्शक माहेश्वर तेटांबे, फोटोग्राफर राजवीर जाधव, अमर पारखे आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

Comments
Post a Comment