कुठरेचे दीक्षित डी.एस.राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराने सन्मानित


तळमावले/वार्ताहर
    राजर्षी शाहुंच्या समतावादी नगरीतील धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार त्यांना साहित्यिक व विचारवंत डाॅ.बाबुराव गुरव यांच्या हस्ते देण्यात आला. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा अॅड.करुणा विमल, प्रमुख पाहुणे आ.ऋतुराज पाटील, प्रा.आ.जयंत आसगांवकर, माजी आमदार राजीव आवळ व अन्य मान्यवर यांच्या हस्ते देण्यात आला.    
    यावेळी डी.एस.दीक्षित यांच्यासमवेत सौ.रुक्मिणी दीक्षित, चेतन दीक्षित, ज्योती दीक्षित, वैशाली सुतार, रविराज सुतार, गणेश वाईकर, सुनिल आसवले, भोई बी.बी. हे उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल डी.एस.दिक्षीत यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान