शरीर निरोगी राहण्यासाठी व्यायामाची गरज -के.जे.चव्हाण


पाटण

        मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये 21 जून आंतराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला,यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.के.जे.चव्हाण हे या योग दिनाच्या कार्यक्रमांसाठी अध्यक्षस्थानी होते, त्यावेळी ते म्हणाले की, योगाचे महत्व तसेच व्यायाम करणे आजच्या काळात गरजेचे आहे,याला प्राचीन काळापासून अनन्य साधारण महत्व आहे,बदलत्या जीवनशैलीमध्ये आपले शरीर तंदुरस्त असावे असे वाटत असेल तर नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे,असे यावेळी आपले मत व्यक्त  केले,तसेच 21 जून योगदिनाचे  महत्व आपल्या प्रास्ताविकेतून उपशिक्षक श्री.संतोष कदम यांनी केले तसेच  योगाचे प्रात्यक्षिकही  केले ,या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विदयार्थ्यांचा उस्फूर्तपणे सहभाग होता.



Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न