राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

तळमावले/वार्ताहर

        पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार स्पर्धेचे पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
        यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कारप्राप्त लेखक आणि पुस्तकांची नावे (कंसात) पुढीलप्रमाणे : आनंद ननावरे (आनंदाच्या कथा), श्रीमंत अनंतमालाराजे राजेमाने (निसर्ग सान्निध्यात बहर तारुण्याचा), सचिन फ.अवघडे (वाटचाल सुक्ष्म ऑटो स्प्रे.पेंटर), आशिष निनगुरकर (कुलुपबंद), प्रा.डाॅ.सुभाष वाघमारे (मी भारतीय), नंदकुमार शेडगे (जाणीव)
        ट्रस्टच्यावतीने यापूर्वी साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा, गणेश-नवरात्र वार्तांकन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारप्राप्त लेखक कवी यांना एका समारंभात गौरवण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे.

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. पुरस्कारप्राप्त सर्व मान्यवरांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!!

    शुभेच्छुक.
    भूषण तांबे - मुंबई

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान