येवती कुस्ती मैदानात सिकंदर शेख विजयी

पैलवान रितिक झिमरे ठरला  चंद्रभागा केसरी किताबाचा मानकरी

येवती गावचे सुपुत्र दीपक शेठ लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरवले जंगी कुस्त्यांचे मैदान 

उंडाळे (प्रतिनिधी) 
            येवती ता.कराड येथे बौद्धजन हित वर्धक संघ येवती मुंबई आणि चंद्रभागा रुलर  डेव्हलपर्स चे दीपक शेठ लोखंडे यांच्यावतीने निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले होते. बौद्धजन हितवर्धक संघ येवती मुंबई यांच्या वतीने संयुक्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जयंतीनिमित्त विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले. यामध्ये मोफत  सर्व रोग निदान शिबिर, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि महिलांसाठी होम मिनिस्टर या स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर प्रमुख व्याख्याते अविनाश भारती यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन चंद्रभागा रुलर  डेव्हलपर च्या वतीने करण्यात आले होते. अशा भरगच्च कार्यक्रमाचे सांगता जंगी कुस्त्याचे मैदान घेऊन करण्यात आली.
            यावेळी भारत केसरी सिकंदर शेख याने रेल्वेचा मल्ल पंजाब केसरी भोला  ठाकूर याला सहाव्या मिनिटांमध्ये आसमान दाखवले. पैलवान रितिक झिमरे हा चंद्रभागा केसरी किताब चा मानकरी ठरला त्याला मानाची गदा देण्यात आली. तर येवतीचा मल्ल ओम शेवाळे यांनी अतिशय प्रेक्षणीय कुस्ती करून विजय मिळवला. या कुस्ती मैदानास हिंदकेसरी दीनानाथ सिंह, पैलवान अक्षय सुर्वे, ज्येष्ठ वस्ताद हरिभाऊ साठे, संपत शेळके, लक्ष्मण शेवाळे, भारतीय सेना दलाचे पैलवान प्रवीण शेवाळे, कुस्ती संघटक तानाजी चवरे, सरपंच सागर शेवाळे यांचे प्रमुख उपस्थिती होती. या कुस्ती मैदानात लहान मोठ्या 75 कुस्त्या निकाली झाल्या सर्व विजेत्या मल्लांना दीपक लोखंडे शेठ यांच्यावतीने सुवर्णपदक व रोैप्य पदक देऊन गौरवण्यात आले. कराड दक्षिण मधील येवती गावामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात जंगी मैदानाच्या आयोजन केल्यामुळे या मैदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
         या मैदानामध्ये विशेष आकर्षण ठरल्या महिलांच्या कुस्त्या या सर्व महिला मल्लांचा सन्मान अपर्णा लोखंडे व सुदर्शना थोरवडे यांच्या वतीने करण्यात आला. या मैदानाचे संपूर्ण नियोजन प्रा.एनआयएस कोच अमोल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.  
        हे मैदान यशस्वी करण्यासाठी बौद्धजन हितवर्धक संघ येवती / मुंबईचे  सर्व पदाधिकारी  जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळ येवती, संतोष थोरवडे, सुरेंद्र सोरटे, नितीन मोरे, ग्रामस्थ मंडळ येवती आदींनी परिश्रम घेतले  .सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रा. दिलीप लोखंडे व दीपक लोखंडे शेठ यांच्या हस्ते करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न