येळेवाडी येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील येळेवाडी (काळगांव) येथे रामनवमी, हनुमान जयंतीच्या निमित्ताने सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व मंदिराचा 10 वा वर्धापन दिन सोहळयाचे आयोजन केले आहे. सदर पारायण सोहळयाचे हे 20 वे वर्ष आहे. श्री सद्गुरु योगीराज हरिहर महाराज, श्री सद्गुरु रामानंद महाराज, श्री सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली सपकाळवाडी यांच्या प्रेरणेने ह.भ.प.जितेंद्र महाराज आवारे, ह.भ.प.बाबुराव महाराज सलते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
पारायण सोहळयाचे कलश पुजन अॅड.विठ्ठलराव येळवे, विनापुजन बाबुराव मस्कर, ग्रंथ पुजन बाजीराव येळवे, ध्वज पुजन सुरेश येळवे तर मुर्तीपुजन अमित येळवे यांच्या हस्ते होणार आहे. मृदंगाचार्य ह.भ.प. जितेंद्र महाराज आवारे, नारायण महाराज सलते, हरिओम आवारे व श्री माऊली मृदंग वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, गायनाचार्य संगीत विशारद ह.भ.प.बाबुराव महाराज सलते, नारायण महाराज सलते, जितेंद्र महाराज आवरे, दादा महाराज खडके, हुनमान महाराज खडके, तर काकडा यासाठी बाबुराव महाराज सलते, नारायण महाराज सलते, पांडूरंग महाराज सलते व सलतेवाडी मंडळ यांची साथ लाभणार आहे.
गुरुवार दि.30 मार्च, 2023 रोजी ह.भ.प.नारायण महाराज येळवे यांचे प्रवचन, ह.भ.प.बाबुराव महाराज सलते यांचे कीर्तन, शुक्रवार दि. 31 मार्च, 2023 रोजी ह.भ.प. विठ्ठल महाराज येळवे यांचे प्रवचन आणि ह.भ.प. दादासाहेब महाराज खडके यांचे कीर्तन, शनिवार दि. 1 एप्रिल, 2023 रोजी ह.भ.प. लक्ष्मण महाराज येळवे यांचे प्रवचन आणि ह.भ.प.नारायण महाराज सलते यांचे कीर्तन, रविवार दि. 2 एप्रिल, 2023 रोजी ह.भ.प. हरिओम महाराज आवारे यांचे प्रवचन आणि ह.भ.प.बबन महाराज करवडीकर यांचे कीर्तन, सोमवार दि. 3 एप्रिल, 2023 रोजी ह.भ.प.पांडूरंग महाराज सलते यांचे प्रवचन आणि ह.भ.प.जितेंद्र महाराज आवारे यांचे कीर्तन, मंगळवार दि. 4 एप्रिल, 2023 रोजी ह.भ.प. राम महाराज सावंत यांचे प्रवचन आणि ह.भ.प.संजय महाराज वाबळे यांचे कीर्तन, बुधवार दि. 5 एप्रिल मार्च, 2023 रोजी दुपारी 3 ते 6 भव्य दिंडी सोहळा आणि ह.भ.प.अक्षय महाराज पवार यांचे कीर्तन होईल. रात्री आळंदीचे विद्यार्थी यांचा जागराचा कार्यक्रम होणार आहे.
तसेच गुरुवार दि.6 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9 ते 11 पर्यंत ह.भ.प.सद्गुरु महाराज दसूरकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसादाने सांगता होईल.
याशिवाय दररोज सकाळी 4 ते 6 काकड आरती, सकाळी 7 ते 12 विष्णू सहस्त्र नाम व ज्ञानेश्वरी पारायण, व दुपारी 2 ते 5 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 5 ते 6 सामुदायिक हरिपाठ, रात्री 7 ते 9 हरिकीर्तन, रात्री 11 ते 4 हरिजागराचा कार्यक्रम होईल.
डाकेवाडी, काळगांव, लोहारवाडी, भरेवाडी, धामणी, आचरेवाडी, कोळगेवाडी, मुटटलवाडी, मस्करवाडी, निवी, ज्ञानेसेवा भजनी मंडळ सलतेवाडी, आळंदीचे विद्यार्थी व पंचक्रोशीतील भजनी मंडळे कीर्तनाला साथ करणार आहेत.
तरी या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविक, ग्रामस्थ यांनी घ्यावा असे आवाहन जय बजरंग गणेशोत्सव मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळ येळेवाडी (काळगांव) यांनी केले आहे.


Comments
Post a Comment