मोरया ग्रुप व हनुमान मंडळाने शिवजयंती जन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करून आदर्श निर्माण केला - हिंदुराव पाटील

ढेबेवाडी/स्पंदन एक्सप्रेस वृत्तसेवा

        मोरया ग्रुप आणि हनुमान मंडळाने शिवजयंती जन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करून खर्या अर्थाने शिवरायांचे विचार जपले आहेत आजच्या काळात शिव विचारांची,त्यांच्या कार्याची पारायणे होणे गरजेची आहेत आज आपल्या मंडळाने गावातील सर्वांना बरोबर घेवून लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनी मिळून सकाळ पासून  उत्साहाने शिवजयंती साजरी केली ही उल्लेखनीय बाब आहे असे प्रतिपादन पाटण तालुका काँग्रेसचे नेते हिंदुराव पाटील यांनी केले. 
           Mandrulkole खुर्द येथील यादववाडी  येथे शिवजयंती जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंच सतिश कापसे, प्रा. पंढरीनाथ कापसे,माजी उपसरपंच संजय लोहार, चेअरमन सुभाष पाटील, व्हा. चेअरमन दादासाहेब साळुंखे, पोलिस पाटील विजय लोहार,तंटामुक्ती अध्यक्ष अमर पाटील, ग्रा.समस्या सौ. संगीता लोहार, ग्रा.समस्या सौ. कमल यादव,सोसायटी संचालक संजय पाटील, अशोक पाटील, महादेव कापसे, धनाजी भरूगडे,माजी चेअरमन अविनाश साळुंखे, माजी सरपंच बी.एम. पाटील, श्री राम ट्रस्टचे अध्यक्ष बजरंग पाटील हनुमान मंडळीचे अध्यक्ष राजेंद्र कदम, मोरया ग्रुपचे अध्यक्ष कमलेश यादव,  वसंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 
          हिंदुराव पाटील पुढे म्हणाले हे गाव वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होत आहे यामुळे सामाजिक उपक्रमात विविधता दिसून येते.गावाने लोक सहभागातून निर्माण केलेल्या वाचनालयास आज सर्वच प्रकारातील भरपूर पुस्तके उपलब्ध झाली आहेत याचा लाभ मुलांनी घ्यावा व स्वतःला समृद्ध करावे. एकूणच लहान मुलांची भाषणे, सैनिक म्हणुन मिलिट्री मध्ये भरती झालेल्या स्वप्निल जानूगडेचा केलेला सत्कार, हिंदुस्थान कंपनीत मोठ्या पदावर नियुक्त होणार्‍या कु प्रज्ञा कापसे हिचा सत्कार, कु, शर्वरी लोहार या कन्येने केलेले शिवाजी महाराजांच्या विषयी दमदार भाषण, महिलांचा जिजाऊ आणि सईबाईच्या वेषातील मिरवणुकीतील सहभाग,  मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाजत  गाजत काढलेली भव्य मिरवणूक आणि दादासाहेब साळुंखे व सर्व कार्यकर्त्यांचे नेटक नियोजन या सर्व गोष्टींनी मी भारावून गेलो या गावच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी मी ही त्याचा कायम वाटेकरी होत राहीन. 
        प्रा.पंढरीनाथ कापसे म्हणाले शिवरायांच्या जीवनातील प्रसंग आपणास आजही मार्गदर्शक आहेत त्याकडे आपण डोळसपणे पहावे शिवरायांनी आपणास जगायला शिकवल आहे त्यांच स्मरण ठेवून आपण वाटचाल करूया. 
       संजय लोहार म्हणाले शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आपणास अभिमान आहे. हा इतिहास तरुणाच्यात जिरवायचा आहे यासाठी शिव चरित्राची पारायणे झाली पाहिजेत. हनुमान मंडळ व मोरया ग्रुपच्या तरुण कार्यकर्त्यांनी शिवजयंतीचे स्तुत्य उपक्रम राबवून इतरांना आदर्श घालून दिला आहे. सामाजिक उपक्रम विविधतेने राबविणे हे येथील कार्यकर्त्यांचे खास वैशिष्ट आहे. त्यांच मनापासून कौतुक करतो. 
          तरुण कार्यकर्त्यांनी सज्जनगड येथून सकाळी ज्योत आणली या नंतर मूर्ती स्थापना करण्यात आणली तरुण कार्यकर्त्यांनी भगवे कुर्ते आणि महिलांनी जिजाऊ सईबाईचे रूप परिधान करून लहान मुलांनी मावळ्यांचा वेषभूषा परिधान करून वाजत  गाजत मिरवणुक काढली. आयोजित कार्यक्रमात स्वप्निल जानूगडे लष्करी सेवेत भरती झाले बद्दल, कु.कापसे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण होवून हिंदुस्थान कंपनीत मोठ्या पदावर नियुक्त झाल्याबद्दल, अमर पाटील तंटामुक्ती अध्यक्ष झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कु.शर्वरी लोहार हिने शिवाजी महाराजांच्या विषयी जोरदार भाषण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले उपस्थितांनी तिला उस्फूर्त बक्षिसे देवून तिचे कौतुक केले. विरेन साळुंखे, शिवम कापसे, प्रसाद यादव यांची पण भाषणे झाली. 
        दादासाहेब साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. मंगेश यादव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमलेश यादव, विनोद कापसे, रमेश साळुंखे, संकेत साळुंखे, सोन्या यादव, अण्णा कदम, अमित कदम, पराग साळुंखे, सुनील साळुंखे,संजय यादव, बाळू चव्हाण, सुहास पाटील, सुजल साळुंखे,विलास कदम, प्रविण चव्हाण यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास परिसरातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग