स्वराज्य रक्षणासाठी मृत्युला हसत हसत कवटाळणारा महापराक्रमी योध्दा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज

तळमावले/वार्ताहर

        स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांना लहान वयात आई आणि तारुण्यामध्ये  आजीच्या (राजमाता जिजाऊ)  प्रेमाला मायेला पारखे  व्हावे लागले. त्यांना आयुष्यात  अनंत अडचणींना सामोरे जावे लागले.  4 संस्कृत ग्रंथांचे लेखक, 13 भाषांचे जाणकार असणारे संभाजी राजे प्रचंड हुशार, विद्वान, बहुविद्याज्ञानी होते. आपल्याविरुद्ध कट रचणाऱ्या स्वराज्य द्रोह्यांना उदार मनाने माफ करणारा, परोपकारी, दयावान राजा म्हणूनही संभाजी राजे वेगळे ठरतात. मैत्री आणि मित्रासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा सच्चा मित्र, शौर्यबळाने शत्रूचाही थरकाप उडविणारा, स्वराज्य रक्षणासाठी मृत्यूला हसत -हसत कवटाळणारा, 'बाप से बेटा सवाई ' ही म्हण सार्थ करणारा महापराक्रमी राजा म्हणजे संभाजी महाराज होत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांनी केले.      

        श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त सांस्कृतिक विभाग व इतिहास विभाग यांचे संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून असे होते शंभुराजे या विषयावर आयोजित व्याख्यान समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांचे शुभहस्ते रांगोळी स्पर्धा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.  

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. अरूण गाडे हे होते. प्राचार्य डॉ. उल्हास माळकर पुढे म्हणाले, छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचा लढा हा कोणा धर्माविरुद्ध नसून अन्याय अत्याचार करणाऱ्या जुलमी सत्ताधीशांविरुद्ध होता. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अरूण गाडे म्हणाले, संभाजी राजांनी राज्यकारभार करताना जातीभेदास थारा दिला नाही. बहुजनांना बरोबर घेऊन स्वराज्य विस्तारासाठी अविरत झटले. त्यांचे महान कार्य  वर्तमानकाळात दिशादर्शक व प्रेरणादायी आहे.                                              या  समारंभास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी, गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.                                          कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अझरुद्दीन पटेल यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. अमित कदम यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ.  रोहिणी हाके यांनी केले. आभार प्रा. अजित पवार यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न