दिनेश, लब्यू मित्रा..!



दिनेश , तु एलआयसीमध्ये एमडीआरटी झाल्याचे ऐकून अंगावर काटा आला. जवळ असतास तर तुला मिठी मारुन तुझे अभिनंदन केले असते. इतका आनंद मला झाला आहे.

यार....मला झर्रकन आपले शाळेचे, बालपणीचे दिवस आठवले. त्यावेळचे आपण आणि आताचे आपण किती बदल झाला आहे आपल्यामध्ये. आपण दहावीपर्यंत एकत्र होतो. त्यावेळी शाळेत नाईटला जाताना आपण किती धम्माल करायचो ते आठवून खूप हसायला येत आहे.
10 वी नंतर तू मुंबईला गेलास आणि "मुंबईवाला" झालास, आपला संपर्क या काळात थोडा कमी झाला. गावी आलास तरी तू आवर्जून भेटायचास. 10 वीच्या स्नेहमेळाव्यास कितीतरी वेळ आपण एकत्र होतो.
शाळेत असताना तुझी चित्रकला सुंदर होती. तुझ्यासारखी चित्रे मला काढता यावीत असे नेहमी वाटायचे. तुझ्याकडे असलेले ग्रेड परिक्षेचे पुस्तक मी कितीदा तरी हाताळले होते. क्रिकेट, आबाधबी, लगोरी, गोटया या खेळामध्ये तू तरबेज होतास. क्रिकेटची आवड तू अजूनही जपली आहेस. मला मात्र ते शक्य झाले नाही.
लहान असताना मला वाटायचे,  ‘‘काय भारी आहे याचे, शाळा झाली आणि लगेच मुंबईला’’  पण त्यावेळी तूझ्यावर असलेली कुटूंबाची जबाबदारी त्या काळात मला कळली नव्हती. तुझ्या वडिलांचे लहानपणीच छत्र हरवले होते. त्यातूनही तू स्वतःच्या जिद्दीवर घडलास आणि घडतोयस. याचे मला खूप अप्रूप वाटते आहे. (वडिलांचा आधार नसल्यानंतर काय होते ते मी सध्या अनुभवतोय) तुझे काम करत असताना तू सामाजिक बांधिलकीही जपताना वेळोवेळी दिसत आहेस याबद्दल देखील मी तुझे अभिनंदन करेन.
आलेल्या अडीअडणींवर मात करत तू निवडलेल्या क्षेत्रात निर्भेेळ यश मिळवणे म्हणजे "यशस्वी" होणे होय असे मला वाटते त्यात तु यशस्वी होत आला आहेस. मित्र म्हणून मला तुझा अभिमान आहे.
एलआयसीमधील "एमडीआरटी" ही स्टेप खूप मोठी आहे, त्यासाठी तू केलेले परिश्रम प्रचंड आहेत. एलआयसीमधील आणि जीवनातील अनेक यशाचे टप्पे तू गाठावेस या तूला खुप खुप शुभेच्छा..!
शेवटी एवढेच म्हणेन,
"दिनेश लब्यू मित्रा..!"
================
तुझा एक शाळकरी मित्र,
डाॅ.संदीप डाकवे
स्पंदन परिवार

(टीप : आपला लहानपणीचा आणि आताचा फोटो मी शेअर करत आहे.)

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न