कृतज्ञता सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण


 पाचवड/वार्ताहर

    महात्मा गांधी विद्यालय पाचवड येथे कृतज्ञता सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ दिमाखदार पणे पार पडला. या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सचे प्रा *.झुंजार माने* हे उपस्थित होते तर  अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री लावंड टी. एस.हे होते. या सप्ताहात चित्रकला, वक्तृत्व ,निबंध व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते व विजेत्यांना आज  शालोपयोगी साहित्य देऊन गौरवण्यात आले. प्रमुख वक्ते श्री झुंजार माने यांनी मा.शरद पवार साहेब यांच्या रयत शिक्षण संस्थेतील वाटचालीचा अत्यंत मोजक्या शब्दात आढावा घेत विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कुमठेकर यांनी केले तर आभार श्री खरात एस.बी. यांनी मांनले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.मोकाशी मॅडम, श्री कचरे  बी.एस. श्री .पवार डी .आर व श्री गोसावी यांनी यांनी विशेष असे परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील पालक ,विद्यार्थी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न