भोसगांव ग्रामपंचायतीमध्ये पस्तीस वर्षानंतर सत्तांतर

तुषार देशमुख (सणबूर)-- पाटण तालुक्यात अतिशय संवेदनशील असणाऱ्या भोसगांव ग्रामपंचायतीमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालक मंत्री ना. शंभूराज देसाई गटाने जोरदार मुसंडी मारत सरपंच पदासह तिन जागेवर दणदणीत विजय मिळवत माजी उपसभापती प्रताप देसाई तसेच पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक प्रमोद देसाई यांना जोरदार दणका देत तब्बल पस्तीस वर्षानंतर या पंचायतीत सत्तांतर घडवण्यात देसाई गटाला यश आले आहे. गेल्या वर्ष भरापासून भ्रष्टाचाराच्या आरोपाने चर्चेत असलेली भोसगांव ग्रामपंचायत होती या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत हाणामारी देखील झाली होती आणि परस्पर तक्रारी होवून प्रमोद देसाई यांच्यासह दोन्ही कडील कार्यकर्त्यांना जेलवारी सुध्दा झाली होती अशा प्रकारे गेले अनेक दिवस भोसगांव मधील ग्रामपंचायतीमध्ये धुसफूस सुरु होती. ना. शंभूराज देसाई गटातील कार्यकर्त्यानी माहिती अधिकारात वाँटर एटीएम घोटाळा बाहेर काढला तसेच ग्रामपंचायतीमधून दिल्या गेलेल्या बोगस उतार्याच्या माध्यमातून महावितरणची फसवणूक झाल्याचे समोर आले होते व महावितरणने ग्रामपंचायत मधील शिपाया विरोधात ढेबेवाडी पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देखील दिली होती या प्रकरणी संशयित शिपाई फरार असल्याचे ढेबेवाडी पोलीसांनी सांगितले अशा अनेक नाट्यमय घडामोडी भोसगांव ग्रामपंचायतीमध्ये घडल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार असल्याने या निवडणूकीकडे तालुक्याचे विषेश लक्ष वेधले होते. भोसगांव ग्रामपंचायत गेल्या विस वर्षांपासून माजी उपसभापती प्रताप देसाई यांच्या ताब्यात आहे परंतु विरोधी ना. शंभूराज देसाई यांनी दोन टप्यात पाच कोटिचा निधी या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अंब्रुळकरवाडीला दिला तसेच अंतर्गत रस्त्यासाठी पंधरा लाख आणि पिण्याच्या पाण्याच्या योजणेसाठी पंधरा लाख असा निधी दिला तर ना. नरेंद्र पाटील यांचा गट देखील ना. शंभूराज देसाई गटाबरोबर गेल्याने देसाई गटाची ताकद आणखीनच वाढली त्यामुळे या वाँर्डमध्ये ना. देसाई गटाला घवघवीत यश मिळाले तर येथील विरोधी पाटणकर गटातील सरपंच पदाच्या उमेवारांच्या पतीने संचयनी सेह्विंग्ज अँन्ड इनव्हेस्टमेंन या संस्थेतील दामदुप्पट योजनेत पैसे गुंतवणूक करायला सांगितले व ते परत दिलेच नाहीत त्यामुळे या उमेदवारावर प्रचंड नाराजी असल्याचे पहायला मिळाले. तर सत्ताधार्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप त्याऔना खोडून काढत आले नाहीत त्यामुळे हे देखील सत्ताधार्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण बनले . ना. शंभूराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधार्यांशी विकासाच्या मुद्यावरून संघर्ष कायम ठेवला परिनामी प्रताप देसाई यांच्या वाँर्डमध्ये झालेल्या पोट निवडणुकीत देसाई गटाचा निसटता पराभव झाला. परंतु या निवडणुकीत देसाई गट मजबूत झाला आणि सहा महिण्यानंतर झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ना.शंभूराज देसाई गटाने सरपंच पदासह तिन उमेदवार निवडून आणत सत्ताधारी प्रताप देसाई यांना जोरदार दणका दिला या विजयाने भोसगांव मधील देसाई गटाच्या कार्यकर्त्यांना उर्जा मिळाली असून या पुढील काळात ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून विकास कामांचा डोंगर भोसगांवमध्ये उभारुन येत्या पंचवार्षिक निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणा असा दावा देसाई गटाकडून करण्यात आला आहे चौकट -- ना. शंभूराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी मायक्रो प्लँनिंग करून हि निवडणूक लढवली या निवडणुकीत ऐन वैळी ना. शंभूराज देसाई यांचा एक गट राष्ट्रवादीच्या प्रताप देसाई यांना जावून मिळाला त्यामुळे भोसगांवात राष्ट्रवादीची ताकद आणखीनच वाढली तरी देखील एवढ्या बलाढ्य शक्तिच्या विरोधात ना.शंभूराज देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी एकतर्फी झुंज देत सत्ता मिळवली. <

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न